SSC Result 2023 | दहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपणार; जूनच्या पहिल्या आठवड्यात निकालाची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – SSC Result 2023 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बारावीनंतर आता दहावीचा निकाल (SSC Result 2023) जाहीर होण्याची वाट शालेय विद्यार्थी बघत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी परीक्षेच्या निकालाबाबत लवकरच
अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून (Maharashtra SSC Board) येत्या जून महिन्याच्या (June) पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावीच्या परीक्षेचा (10th Result) निकाल जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यभरात झालेल्या जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपामुळे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, हा संप मागे घेतल्यानंतर शिक्षक जोरदार कामाला लागले व त्यामुळे बारावी बोर्ड परीक्षा निकाल वेळेत जाहीर झाला आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी निकालाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे दहावीचा निकाल देखील वेळेतच जाहीर होण्याची शक्यता आहे.

दहावीच्या निकालासंदर्भात (SSC Result 2023) विविध तारखा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल
होत आहेत, त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहान करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थी पाहू शकणार आहेत.

मागील वर्षी दहावीच्या निकालाची टक्केवारी 96.94% इतकी होती.
त्यामुळे या वर्षीचा निकाल काय लागेल यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advt.

Web Title : SSC Result 2023 | The wait for 10th result will be over; Result likely in first week of June

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MHT-CET Result 2023 | येत्या जून महिन्यात होणार MHT-CET चा निकाल जाहीर; रिजल्ट पाहण्यासाठी या स्टेप करा फॉलो

Devendra Fadnavis | राज ठाकरेंच्या भेटीबाबत देवेंद्र फडणवीसांचा खुलासा, म्हणाले-‘…म्हणून शिवतीर्थावर गेलो होतो’ (व्हिडिओ)

Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन बनला राज्याचा ‘स्माइल ॲम्बेसेडर’; व्यसनांविरोधात करणार जनजागृती