SSC Selection Post Phase 9 2021 | सरकारी नोकरीचा शोध संपणार, एसएससीने 3261 पदांसाठी काढली ‘व्हॅकन्सी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  SSC Selection Post Phase 9 2021 | एसएससीने सिलेक्शन पोस्ट फेज-09 चे नोटिफिकेशन जारी केले आहे. फेज IX/2021/सिलेक्शन पोस्ट अंतर्गत आयोगाने 3261 पदांवर व्हॅकन्सी काढली आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या 271 विभागांमध्ये तैनात केले जाईल. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 24 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. उमेदवार कर्मचारी निवड आयोगाची वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज (SSC Selection Post Phase 9 2021) करू शकतात.

ऑफिशियल वेबसाइटवर जाण्यासाठी या डायरेक्ट लिंकवर करा क्लिक

https://ssc.nic.in/

या तारखा लक्षात ठेवा

ऑनलाइन अर्ज करण्यास सुरूवात 24 सप्टेंबर, 2021

– Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोब्र 2021

ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021

ऑफलाइन चलान जनरेट करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021

चलानच्या माध्यमातून पैसे भरण्याची शेवटची तारीख (बँकेच्या कामाच्या दिवसात) 1 नोव्हेंबर 2021

कम्प्युटर आधारित परीक्षेची तारीख जानेवारी/फेब्रुवारी 2022

अर्ज शुल्क

उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रूपये आहे. शुल्क ऑनलाइन भीम यूपीआय, नेट बँकिंग, वीजा, मास्टरकार्ड, क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून भरता येईल. याशिवाय एसबीआयच्या शाखांमध्ये एसबीआय चलन जनरेट केले जाऊ शकते.

महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), दिव्यांग व्यक्ती (पीडब्ल्यूडी) आणि आरक्षणासाठी पात्र माजी सैनिकांना (ईएसएम) संबंधीत उमेदवारांना शुल्क भरण्यात सूट दिली आहे. भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकतात.

Web Title : SSC Selection Post Phase 9 2021 | ssc post phase 9 2021 ssc has released posts phase ix 2021 notification for 3261 pots registration begins

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Freelance Professionals | फ्रीलान्स करत असाल काम तर द्यावा लागू शकतो GST, जाणून घ्या या आवश्यक तरतूदी

PMC Lok Adalat | पुणे महापालिकेतील लोक अदालतीमध्ये 1369 केसेस निकाली; ‘इतक्या’ लाखाची थकित रक्कम वसुल

PMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिकेत 91 जागांसाठी मोठी भरती; पगार 1.50 लाख रूपयांपर्यंत