ST Employees Strike in Maharashtra | उद्योगमंत्री उदय सामंतांकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी सोमवारी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण (ST Employees Strike in Maharashtra) सुरु केले होते. आंदोलनामुळे ऐन गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav) तोंडावर एसटीची सेवा ठप्प होऊन नागरिकांचे हाल होण्याची शक्यता होती. मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी महागाई भत्यासह (Inflation Allowance) इतर मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन एसटी कर्मचाऱ्यांना दिले. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी 13 सप्टेंबर रोजी करण्यात येणारे राज्यव्यापी बेमुदत उपोषण (ST Employees Strike in Maharashtra) स्थगित केले आहे.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने (Maharashtra ST Workers Union) 11 सप्टेंबर पासून प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण आंदोलन सुरु केले होते. एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषण घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.

या बैठकीत उदय सामंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता (House Rent Allowance), वार्षिक वेतनवाढ (Annual Increment) देण्याच्या मागण्यांची दखल घेतली. तसेच या मगाण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उदय सामंत यांनी भेट घेऊन चर्चा केली. यानंतर उदय सामंत यांच्या शासकीय निवासस्थानी सोमवारी रात्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बराचवेळ झालेल्या चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यावर यशस्वी तोडगा काढण्यात आला. (ST Employees Strike in Maharashtra)

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सोमवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद
दिला असून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत.
त्यामुळे बेमुदत उपोषण स्थगित करण्याचे आल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Low Cost Fruit And Vegetables Benefits | सर्व प्रकारच्या रोगांचे शत्रू आहेत ‘ही’
5 स्वस्त कलरफुल फळे आणि भाज्या, आराग्यात ताजेपणा येण्यासाठी रोज खा

Why Do Women Have More Sleep Problems | महिलांना सर्वात जास्त का होते झोपेची समस्या?
जाणून घ्या 3 मोठी कारणे, ‘स्‍लीप डिसऑर्डर’ची ही लक्षणे