Why Do Women Have More Sleep Problems | महिलांना सर्वात जास्त का होते झोपेची समस्या? जाणून घ्या 3 मोठी कारणे, ‘स्‍लीप डिसऑर्डर’ची ही लक्षणे

नवी दिल्ली : Why Do Women Have More Sleep Problems | ‘वुमन्स हेल्थ’नुसार, महिलांना पुरेशी झोप मिळाल्याने त्यांचे मन आणि शरीर निरोगी राहते. झोपेत असताना शरीर ऑटोहील करते. परंतु रेस्टलेस लेग सिंडड्ढोम असेल तर झोप येणे कठीण होते. झोप न लागणे किंवा कमी झोपेमुळे महिलांच्या मेंटल हेल्थवर खुप लवकर परिणाम होतो. (Why Do Women Have More Sleep Problems)

दिवसभर फ्रेश राहण्यासाठी महिलांनी किमान ७ ते ९ तास झोपणे आवश्यक आहे. प्रेग्नंट महिला, तसेच ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांनी यापेक्षा जास्त विश्रांती घेण्याची आवश्यकता असते. तसेच, न्यू मॉम असाल तरीही, चांगली झोप आवश्यक आहे. (Why Do Women Have More Sleep Problems)

पुरूषांपेक्षा स्त्रियांमध्ये झोप न येण्याची समस्या जास्त का असते, याबाबात बोलायचे तर याची ३ प्रमुख कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे प्रीमेस्ट्रम सिंड्रोम (पीएमएस) आणि प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर (पीएमडीडी). ही समस्या मासिक पाळीच्या समस्येशी संबंधित असते, ज्यामुळे रात्रभर झोप येत नाही आणि महिलांमध्ये डिप्रेशनचे कारण ठरते. (Womens Health)

झोपेवर परिणाम होण्याचे दुसरे कारण म्हणजे प्रेग्नंसी होय. विशेषत: थर्ड ट्रायमेस्टर, ज्यामध्ये महिलांना पायात होणारे क्रॅम्प्स, झोपायला त्रास होणे आणि वारंवार बाथरूमला जाण्यासाठी जागे होणे असू शकते. तिसरे कारण म्हणजे पेरीमेनोपॉज, ज्यामुळे रात्री हॉट फ्लश आणि जास्त घाम येणे.

स्लीप डिसऑर्डरची लक्षणे (Symptoms of Sleep Disorders)

  • अनेक प्रयत्न करूनही झोप न येणे
  • झोपेत असताना अचानक श्वास घेण्यास अडचण येणे
  • जोडीदार सांगत असेल की तुम्ही झोपेत असताना अनेकवेळा श्वास घेत नाही
  • तुमचा पाय सतत हालत राहतो
  • झोपेत घोरणे
  • रात्री वारंवार टॉयलेटला जाणे
  • सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही
  • दिवसभर झोप येत राहते.

वरील लक्षणे दिसल्यावर डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mouni Roy | अभिनेत्री मौनी रॉयच्या बिकिनी फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग; मालदीवमध्ये करतीये व्हेकेशन एन्जॉय

Pune Crime News | अश्विनी क्लासिक सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून घरफोडी, कोंढव्यातील NIBM Road वरील घटना

Mera Bill Mera Adhikar द्वारे कसे जिंकू शकता १ कोटी रुपयांपर्यंत बक्षीस, जाणून घ्या पूर्ण पद्धत

Janhvi Kapoor | जान्हवीच्या क्रॉप टॉपने वेधले उपस्थितींचे लक्ष; फोटो व्हायरल