ST Workers Strike | संप करणार्‍या एसटी कर्मचाऱ्यांवर 20 डिसेंबरपर्यंत मेस्मा नाही – अनिल परब

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Strike | राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये (Maharashtra Government) विलीनीकरण करावे यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप (ST Workers Strike) पुकारला आहे. अजूनही तो सुरु असून २० डिसेंबरला उच्च न्यायालयात (Mumbai High Court) राज्य सरकारला प्राथमिक म्हणणे मांडायचे आहे. त्याअनुषंगाने कायदेशीर चर्चा सुरु आहे. शुक्रवारी संपकरी कर्मचाऱ्यांवर (ST Workers Strike) मेस्मा (Mesma Act) लावायचा की नाही यावर चर्चा केली असून २० डिसेंबरपर्यंत तरी त्यावर निर्णय होणार नसल्याचे संकेत परिवहन मंत्री (Transport Minister) अनिल परब (Anil Parab) यांनी दिले.

 

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक परिवहनमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांचा संप, न्यायालयातील सुनावणी आदींवर चर्चा झाली. त्यानंतर बोलताना परब म्हणाले की, सर्वांशी चर्चा करूनच कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावायचा की नाही यावर निर्णय घेतला जाणार आहे. विलीनीकरणाच्या प्रश्नाबाबत न्यायालयाने समिती नेमली असून त्याला १२ आठवड्यांची मुदत होती. त्या पार्श्वभूमीवरच २० डिसेंबरला प्राथमिक मत काय आहे याचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे या कायदेशीर बाबीवर चर्चा करण्यासाठीच अधिकाऱ्यांची बैठक झाली. कामावर न आलेल्या १० हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून त्यातील ६३ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अडीच हजार कंत्राटी कामगारांची सेवा संपली असल्याचेही त्यांनी सांगितले.

३५५ कर्मचारी बडतर्फ
गेल्या दीड महिन्यांपासून महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यावर कर्मचारी ठाम आहेत.
त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर (ST Workers Strike) कारवाईचा बडगा उगारण्यास महामंडळाने सुरु केला आहे.
शुक्रवरी महामंडळाने २२ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून ५० कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
महामंडळाने ६३ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे महामंडळाने बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ३५५ झाली आहे.

 

कारवाईनंतरही कामावर येणाऱ्यांची संख्या कमी
महामंडळाने कर्मचाऱ्यांना वेतन वाढ दिली. मात्र, तरीही कर्मचाऱ्यांनी संप सुरु ठेवला.
आतापर्यंत महामंडळाने राेजंदारीवरील २ हजार ५५ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून, १० हजार ७०१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
याशिवाय २ हजार ७८८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
मात्र, निलंबनाच्या कारवाईनंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे.
सोमवारपर्यंत संपकरी निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची शेवटची संधी दिली होती.
त्यानुसार १० हजार १८० पैकी केवळ १४९ निलंबित कर्मचारी कामावर हजर झाले.
त्यामुळे आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यास सुरुवात केली आहे.
शुक्रवारी पुन्हा ५१ एसटी कर्मचारी निलंबित केले असून, २२ निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.

 

Web Title :- ST Workers Strike | st workers strike decision impose mesma liaison workers after 20th information transport minister anil parab msrtc

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau | 1 रुपया हुंडा घेऊन सर्वांकडून पाठ थोपटून घेणारा नार्कोटिक्स विभागातील पोलीस निरीक्षक 2 लाखांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

Anti Corruption Bureau Pune | पिंपरी चिंचवड महापालिकेतील दोन लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Sukesh Chandrashekhar | ‘जॅकलिन-नोरा’नंतर श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टी सुद्धा ठग सुकेश चंद्रशेखरच्या केसमध्ये ‘सामील’?