Staff Selection Commission Recruitment | 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी ! 25000 जागा; कॉन्स्टेबल भरतीचं नोटिफिकेशन जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टाफ सिलेक्शन कमिशनने (Staff Selection Commission Recruitment) CAPF मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी किंवा जीडी), SSF आणि आसाम रायफल्स (Assam Rifles) मध्ये रायफलमन या पदांसाठी जीडी कॉन्स्टेबल (GD Constable) भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केले आहे. पात्र उमेदवारांना स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या भरती (Staff Selection Commission Recruitment) प्रक्रियेची बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा होती. अखेर या पदांच्या भरतीचे नोटिफिकेशन जारी केल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी मे महिन्यात नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते. एकूण 25,271 पदांवर भरती प्रक्रिया होणार आहे.

Staff Selection Commission Recruitment | ssc gd constable notification 2021 released for 25271 post apply online at ssc nic in check all details here

https://twitter.com/ssc_official__/status/1416195982316896257?s=20

पुरुष आणि महिलांसाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशननं यावेळी 25 हजार 271 पदांवर भरती प्रक्रिया राबवली आहे. भरती प्रक्रियेत पुरुष उमेदवारांसाठी 22 हजार 424 जागा आहेत. तर महिलांसाठी 2847 पद आहेत. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ssc.nic.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 ही आहे. तर अर्जाचं शुक्ल ऑनलाइन जमा करण्याची शेवटची मुदत 2 सप्टेंबर 2021 तर चलनाद्वारे शुल्क भरण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2021 पर्यंत आहे. टियर-1 परीक्षेची (सीबीटी) तारीख नंतर कळवण्यात येणार आहे.

विभागनिहाय पदसंख्या

बीएसएफ (BSF) – 7545
सीआयएसएफ (CISF) – 8464
एसएसबी (SSB) – 3806
आयटीबीपी (ITBP) – 1431
आसाम रायफल्स (Assam Rifles) – 3785
एसएसएफ (SSF) – 240
यावेळी सीआरपीएफ (SRPF) आणि एनआयएमध्ये (NIA) जागा निघालेल्या नाहीत.

शैक्षणिक पात्रता

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सीएपीएफ जीडी कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांचे वय 18-23 वर्षाच्या दरम्यान असेल, असेच उमेदवार अर्ज करु शकतात.

शारीरिक पात्रता

उंची
पुरुष उमेदवार – 170 सें.मी.
महिला उमेदवार – 157 सें.मी.
छाती
पुरुष उमेदवार – 80 सेमी. (फुगवून – 85 सेमी)

पगार

उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना पे लेवल -3 प्रमाणे 21,700-69,100 रुपये पगार मिळणार आहे.

हे देखील वाचा

CM Uddhav Thackeray | ‘महिलांनो, तुमच्याकडं कोणी वाईट नजरेनं पाहिलं, तर त्याला धडा शिकवा’ !
Pimpri Crime | 1.5 कोटींची फसवणूक ! ‘पुणे पिपल्स’चा सेवानिवृत्त बँक मॅनेजर महेश केकंरे, विनोदकुमार जैन-पाटणी, प्रकाश गुजर, स्वप्नील राक्षेवर FIR दाखल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Staff Selection Commission Recruitment | ssc gd constable notification 2021 released for 25271 post apply online at ssc nic in check all details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update