‘स्टार डान्सर’ सपना चौधरीला ‘या’ लहान मुलीनं स्टेजवर दिली जोरदार ‘टक्कर’ ! डान्स व्हिडीओ ‘व्हायरल’

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री, सिंगर आणि स्टार डान्सर सपना चौधरी जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अॅक्टीव असते. सपनाचा एका डान्स व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. सपनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओत सपना एका लहान मुलीसोबत डान्स करताना दिसत आहे.

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, सपना चौधरी स्टेजवर डान्स करत आहे. यावेळी तिच्यासोबत एक लहान मुलगी देखील आहे. असं सजमत आहे की, ही मुलगी सपना चौधरीची फॅन आहे. एकना एक स्टेप तिला पाठ आहे. सनपाची प्रत्येक स्टेप ती हुबहूब करत आहे. तेरी आख्या का यो काजल या गाण्यावर दोघी जबरदस्त डान्स करत आहेत. सपनाही या चाहतीच्या स्टेप्स पाहून चकित झाली. जमलेली गर्दीही आउट ऑफ कंट्रोल होताना दिसते.

सपनाचा हा लहान मुलीसोबत डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक चाहते सोशलवर हा डान्स शेअर करताना दिसत आहे. दोघींची जुगलबंदी चाहत्यांना खूप भावली आहे.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे.