नोकरी जाण्याची वाटत असेल भिती तर सुरू करा ‘हा’ बिझनेस, 10 वर्षापर्यंत होईल लाखोमध्ये ‘कमाई’

नवी दिल्ली : कोरोना काळात नोकर्‍या कमी झाल्या आहेत. या कारणामुळे लोकांनी नवीन व्यवसायाच्या कल्पनांवर विचार करण्यास सुरूवात केली आहे. जर तुम्ही सुद्धा घरबसल्या काही नवीन करण्याचा विचार करत असाल आणि जास्त शिकलेले नसाल तर हा व्यावसाय तुमच्यासाठी खुप चांगला ठरू शकतो.

सरकारी नोकरीची तयारी करणार्‍या योगेशने शेती निवडली आणि 7 शेतकर्‍यांसोबत मिळून जिरे ची ऑर्गेनिक शेती सुरू केली. आज त्यांचा हा प्रवास 3000 शेतकर्‍यांसह जपान आणि अमेरिकापर्यंत पोहचला आहे. योगेशला शेतीमध्ये असलेली आवड त्याच्या शिक्षणाच्या काळात जागृत झाली. योगेशने ग्रॅज्युएशननंतर ऑर्गेनिक फार्मिंगमध्ये डिप्लोमा केला होता. परिणाम असा झाला की, शेतीमधील त्याचा इंटरेस्ट जागृत झाला. त्याला असेही म्हटले गेले की, जर शेतीची एवढीच आवड असेल तर अ‍ॅग्रीकल्चर सुपरवायजर बनून शेती आणि शेतकर्‍यांची सेवा कर, थेट शेतकरी बनून शेती करण्याची जोखीम घेऊ नकोस.

अशी केली बिजनेसला सुरूवात
सुरूवातीला योगेशने या गोष्टीवर फोकस केला की, या क्षेत्रात कोणते पिक घेतले तर जास्त फायदा होऊ शकतो. बाजारात कोणत्या पिकाला जास्त मागणी आहे. तेव्हा त्याला समजले की, जीरे ला नगदी पिक म्हटले जाते आणि पिकही भरघोस येते, त्याने हेच पिक घेण्याचा निर्णय घेतला. 2 एकर शेतात जीर्‍याची जैविक शेती केली, त्याला अपयश आले, पण तो हिम्मत हरला नाही. आज त्याचा 60 कोटीचा टर्न ओव्हर आहे.

10 लाख रुपयांचा टर्न ओव्हर
7 शेतकर्‍यांसोबत झालेल्या सुरूवातीने आज विशाल आकार घेतला आहे. योगेशसोबत 3000 पेक्षा जास्त शेतकरी जोडले गेले आहेत. 2009 मध्ये त्यांचा टर्न ओव्हर 10 लाख रुपये होता. आता त्यांची फर्म रॅपिड ऑर्गेनिक प्रा.लि (आणखी 2 सहकारी कंपन्या) चा वार्षिक टर्न ओव्हर आज 60 कोटीपेक्षा जास्त आले. आज हे सर्व शेतकरी जैविक कृषी करून केमिकल फ्री शेती करत आहेत.