पावसाळयात ‘हा’ व्यवसाय करून दररोज ५ ते १० हजार रूपये कमवा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतात मान्सूनचे आगमन झाले आहे. १५ जुलै पर्यंत देशातील सर्वच भागात मान्सून आपली चाहूल देणार आहे. तुम्हाला माहीतच असेल की, मान्सून सीजनमध्ये छत्री, रेनकोट आणि स्कुल बॅग यांची डिमांड सर्वाधिक असते. तुम्हीदेखील छोटा-मोठा बिजनेस करून बऱ्यापैकी पैसे कमवू शकता. हे बिजनेस १० ते २५ हजार रुपयांचे भांडवल गुंतवून सुरु करू शकता. हे बिजनेस पुन्हा वेगाने पुढे वाढवू शकता. बिजनेस कसा सुरु केला जाऊ शकतो याचीच माहिती आपण घेणार आहोत शिवाय तुम्ही यातून किती नफा मिळवू शकता हेही आपण पाहणार आहोत.

५००० रुपयांत सुरू करू शकता हे दोन बिजनेस

रेनकोट आणि छत्र्यांचा बिजनेस करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला ५००० रुपयांच्या भांडवलाची आवश्यकता आहे. यातील प्रत्येक पीसमागे तु्म्हाला २०-२५ टक्के मार्जिन मिळू शकते. रेनकोट, छत्री, मॉस्किटोनेट, रबड़ शूज यांची डिमांड पावसाच्या सीजनमध्ये सर्वाधिक असते. तुम्ही ठोक मार्केटमधून हे सामान खरेदी करू शकता. लोकल मार्केटमध्ये या वस्तू विकून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. हे सामान तुम्ही थेट मॅन्युफॅक्चर्सकडूनही खरेदी करू शकता.

image.png

२०-२५ टक्के प्रॉफिट मार्जिन

रेनकोट, मॉस्किटोनेट सारखं सामान घरीही बनवलं जाऊ शकतं. जर तु्म्हाला शिलाईची आवड असेल तर बाजारातून सामान खरेदी करून घरीही ते बनवू शकता. तुम्हाला हे सामान लोकल मार्केटमध्ये विकल्यानंतर २०-२५ टक्क्यांचं प्रॉफिट मार्जिन आरामात मिळेल. या व्यवसायाची सुरुवात ५००० रुपये गुंतवूनही केली जाऊ शकते.

कोठून खरेदी कराल कच्चा माल ?

जर तुम्ही दिल्ली किंवा आसपासच्या भागात रहात असाल तर, येथीलच ठोक मार्केट जसे सदर बाजार, चांदनी चौक मधून कमी किंमतीत कच्चा माल खरेदी करू शकता. जर तुम्ही दिल्लीच्या बाहेर रहात असाल तर, तुम्ही तुमच्या शहराच्या ठोक मार्केटमधून सामान खरेदी करू शकता. ठोक मार्केटमधून हे खरेदी केल्यानंतर तुम्ही हे सामान लोकल मार्केटमध्ये रिटेलर्सला विकू शकता. येथून तुम्ही छत्री आणि रेनकोट बनवण्याचं सामान खरेदी करू शकता आणि ते घरीही बनवू शकता.

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर