छोट्या व्यापार्‍यांनी ‘इन्कम टॅक्स’ विभागापासून ‘उत्पन्‍न’ लपवलं तर होणार २००% दंड, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही छोटे व्यवसायिक किंवा स्टार्ट अप असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. नव्या कायद्यानुसार जर एखादे स्टार्टअप किंवा व्यवसायिक एंजेल करावर असलेल्या सूटीचा गैर फायदा घेत असतील तर त्यांना दंडाच्या बोज्याला समोरे जावे लागेल. सरकारने उत्पन्न लपवणाऱ्या स्टार्ट अप विरोधात कठोर पावले उचलली आहेत. जेणे करुन एंजेल टॅक्सच्या नियमांचा दुरुपयोग रोखण्यात येईल.

तर भरावा लगाले २०० टक्के दंड

एंजेल टॅक्समधील सूटीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास या स्टार्टअप आणि छोट्या व्यापारांना २०० टक्के दंड भरावा लागेल. याच वर्षी फेब्रुवारीत आयकर विभागाने स्टार्टअपला डिक्लरेशनवर सूटचा फायदा घेण्याचे सांगितले होते. परंतू या सूटच्या कोणत्याही व्यापार्‍याने किंवा स्टार्टअपने आपले उत्पन्न लपवण्यासाठी वापर केला तर त्याला २०० टक्के दंड भरावा लागेल.

काय होणार कायद्याचा परिणाम

१. आयकर विभागापासून उत्पन्न लपल्यास स्टार्टअपला महागात पडू शकते.

२. एंजेल टॅक्सच्या नियमांचा दुरोपयोग केल्यास आता २०० टक्के दंड भरावा लागेल.

३. सरकारने अर्थ संकल्पात एंजेल टॅक्सशी संबंधित नियमात बदल केले.

४. आपले डिक्लरेश्न देऊन एंजेल टॅक्समध्ये सूट मिळवा.

५. त्यात सिद्ध करावे त्यांनी नियमांविरोधात गुंतवणूक केलेली नाही.

६. जमीन, १० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या गाड्या आणि दागिने यात गुंतवणूक करण्यास बंदी

७. याशिवाय स्टार्टअप कोणाकडून देखील कर्ज किंवा अ‍ॅडवान्स घेऊ शकणार नाही.

८. याचे उल्लंघन केल्यास कलम ५६ अंतर्गत दंड.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like