State Bank of India RD | SBI बँकेची रिकरिंग डिपॉझिट स्कीम देतीये घसघशीत परतावा; 5,000 च्या गुंतवणूकीवर मिळवू शकता 55,000 परतावा

पोलीसनामा ऑनलाइन – State Bank of India RD | गुंतवणूकदार सुरक्षित ठेवीसाठी बॅंक एफडी (Bank FD) किंवा आरडी या पर्यायाला पसंती देतात. कोणत्याही रिक्स शिवाय चांगल्या परताव्यासाठी सरकारी बॅंकेमध्ये (Government Bank) पैसे गुंतवणूक केले जातात. देशामधील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या एसबीआय बँकेची (SBI Bank Scheme) फायदेशीर स्कीम समोर आली आहे. यामध्ये महिन्याला अगदी ठराविक रक्कम जरी गुंतवली तरी देखील चांगला परतावा मिळवता येईल. एसबीआय बॅंकेची ही एक आरडी स्कीम (State Bank of India RD) आहे. आरडी स्कीम म्हणजे रिकरिंग डिपॉझिट स्कीम. (Recurring Deposits) ज्यामध्ये अगदी 5,000 रुपयांपासून गुंतवणूक केली तरी देखील 55,000 रुपयांपर्यंत परतावा मिळवता येईल.

एसबीआय बॅंक अर्थात स्टेट बॅंक ऑफ इंडिया ही देशातील अनेक लोकांची पसंती आहे. बॅंकमध्ये होणारी सुरक्षित गुंतवणूक आणि चांगल्या स्कीम यासाठी एसबीआय बॅंक नावाजली जाते. आता स्टेट बॅंक ऑफ इंडिया कडून एक आरडी स्कीम दिली जात आहे. या रिकरिंग डिपोझिट वर गुंतवणूकदारांना 6.8 टक्के व्याजदर (SBI Bank RD Interest Rate)दिले जात आहे. तर जेष्ठ लोकांना 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे. या आकर्षक व्याजदरामुळे लोकांची चांगली पसंती या स्कीमला मिळत असून यामधून चांगला परतावा मिळवण्याची संधी मिळत आहे. या आरडी स्कीममध्ये जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. तुमच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या कार्यकाळासाठी तुम्ही ही गुंतवणूक करु शकता. तसेच अगदी 100 रुपयांपासून देखील गुंतवणूक करता येऊ शकते.

एसबीआय बॅंकेच्या या आरडी स्कीममध्ये 100 रुपयांपासून सुरुनात करता येत असून दर महिन्याला 100 रुपये जमा करावे लागतात. 1 किंवा 2 वर्षांसाठी आरडी करता येते. जास्तीत जास्त 10 वर्षे आरडी करता येते. तुम्हाला जर 55000 रुपये व्याज हवे असेल तर प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये अशी 5 वर्षे आरडी करावी लागेल. यावर तुम्हाला बँकेकडून 6.5 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. दरवर्षी चक्रवाढ केलेल्या रकमेवरील व्याज देखील वाढेल आणि तुम्हाला 5 वर्षांनी 54,957 रुपये व्याज मिळेल. आरडीच्या कार्यकाळानुसार व्याजदरामध्ये फरक पडेल.

जर आरडी (State Bank of India RD) ही 1 किंवा 2 वर्षांपर्यंत केली असेल
तर सर्वसामान्य लोकांना 6.8 टक्के व्याज मिळेल तर जेष्ठ व्यक्तीला 7.30 टक्के व्याजदर मिळणार आहे.
तसेच जर आऱडी ही 2 वर्षांपेक्षा जास्त 3 वर्षांपर्यंत केली तर सामान्य लोकांना 7 टक्के व्याजदर आणि
जेष्ठ लोकांना 7.50 व्याजदराचा लाभ घेता येणार आहे. 3 वर्षापेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी कार्यकाळासाठी आरडी केली
तर सामान्य लोकांना 6.50 टक्के तर जेष्ठांना 7 टक्के व्याजदर मिळणार आहे.
आणि आरडी ही पाच वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंत केली तर सामान्य लोकांना 6.50 टक्के आणि
जेष्ठांना 7.50 टक्के व्याजदर मिळणार आहे. गुंतवणूकदार ही जास्तीत जास्त परतावा आणि
सुरक्षित गुंतवणूकीसाठी पर्याय शोधत असतात. एसबीआय बॅंकेची ही आरडी स्कीम अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कॉलेजमधून तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार; तरुणाला अटक