State Board CET 2021 | ’11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी तारीख जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – State Board CET 2021 | राज्यात यंदाचा 10 वी आणि 12 वीचा निकाल जाहीर करण्यात आला. यांनतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेशाची ओढ लागली आहे. महाविद्यालयात प्रवेश कसा घ्यावयाचा या कारणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता, 11 वी प्रवेश प्रक्रियेची (11th admission process) तारीख जारी करण्यात आली आहे. 16 ऑगस्टपासून ऑनलाइन पद्धतीनं अर्ज (Online Admission Application) करता येणार आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी अकरावीला (State Board CET 2021) प्रवेश घेऊ शकणार आहे.

मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या 6 महापालिका क्षेत्रात 11 वीच्या प्रवेशासाठी ही ऑनलाइन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेअगोदर राज्य मंडळातर्फे (State Board) CET घेतली जाणार आहे. CET परीक्षेआधी अर्जाचा पहिला भाग आणि परीक्षेनंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 13 ऑगस्टपर्यंत तात्पुर्ती नोंदणी (मॉक डेमो) सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी मॉक डेमोसाठी भरलेली ही सर्व माहिती 13 ऑगस्टनंतर डिलीट केली जाणार
आहे. त्यानंतर 16 ऑगस्टपासून प्रत्यक्षात ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरवा लागणार आहे. CET
परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्राथमिक माहितीबरोबर शुल्क भरुन अर्ज लॉक करावा लागणार आहे.
त्यानंतर CET परीक्षेत मिळालेले गुण आणि पसंती नंबर यानुसार अर्जाचा दुसरा भाग भरायचा आहे.
https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्याला अर्ज भरता येणार आहे.

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | उड्डाणपूल उदघाटन कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याने छगन भुजबळ ‘नाराज’; पालकमंत्री म्हणाले…

Pune News | खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीचा वाचला प्राण (Video)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  State Board CET 2021 | eleventh online admission process date announced you can apply from 16th august

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update