State Government Employees | गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा, आधीच होणार पगार; परिपत्रक जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2022) धामधूम सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) सरकारी कर्मचाऱ्यांना (State Government Employees) मोठा दिलासा दिला आहे. सणसमारंभासाठी सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारकांचा 29 ऑगस्टला पगार (Salary) करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उत्सव साजरा करताना अडचण येऊ नये यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा (State Government Employees) लवकर पगार केला जाणार आहे. याबाबत शासनाने परिपत्रक (Circular) काढले आहे.

 

कोरोना महामारीमुळे (Corona Epidemic) दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदाचा गणेशोत्सव कोणत्याही अटीविनाच साजरा केला जाणार आहे. यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले आहे.

 

गणेशोत्सव साजरा करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा
(State Government Employees) ऑगस्ट महिन्याचा पगार त्यांच्या बँक खात्यात 29 ऑगस्टला जमा होणार आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त अनेक जण आपल्या गावी जातात तर अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान होत असतात.
गणेशोत्सवाच्या आधी पगार मिळावा अशी मागणीचे निवेदन राज्य शिक्षक परिषदेने (State Teachers Council) मुख्यमंत्र्यांना दिले होते.

 

Web Title :- State Government Employees | salary of maharashtra govt employees will be released on august 29 circular issued

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Zilla Parishad | जिल्हा परिषदेत सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी खास मोहीम

 

CM Eknath Shinde | ‘पहाटेच्या शपथविधीला जयंत पाटील होते ?’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

Pune Crime | लोणी काळभोर परिसरातील पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा, 10 जणांना अटक