पुतळ्याच्या बांधकाम खर्चात होतील दोन IIT , पाच IIM , सहा मंगळ मोहीमा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (प्रेरणा परब-खोत) – भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ चे अनावरण मोठ्या दिमाखात आज करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. हा पुतळा नर्मदा नदीच्या काठी बांधण्यात आला आहे.  मात्र १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याविषयी गेल्या  काही महिन्यापासून चर्चा सुरु आहे. तब्बल २ हजार ९८९ कोटी रुपये खर्च करुन हा पुतळा बांधण्यात आला आहे.
भारत हा विकसनशील देश आहे.  या पुतळ्याच्या खर्चाकरिता तब्बल २ हजार ९८९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत पण भारतासारख्या विकसनशील देशात इतका खर्च करून पुतळा बांधण्याऐवजी इतरही शाश्वत विकासाची बरीच कामे करता आली असती. या खर्चात दोन नवीन भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) ,पाच भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम), आणि सहा वेळा भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)कडून  मंगळ मोहीम झाली असती.
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ च्या बांधकाम खर्च हा गुजरात सरकार ने केंद्र सरकारला सादर केलेल्या  पंतप्रधानां कृषी-सिंचन योजनेपेक्षा दुप्पट आहे. या पुतळ्याच्या बांधकामात जेवढा खर्च आहे. तेवढ्या खर्चात जवळपास ४०,१९२ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असती. १६२ सिंचन योजनांचे नूतनीकरण दुरुस्ती आणि देखभाल करता येईल. तसेच ४२५  बांधणीचे बांधकाम करता आले असते.
विकासकामांचा अंदाजे खर्च –
२०१७-१८मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत केंद्र  सरकारने गुजरात राज्यासाठी  मंजूर केलेली रक्कम आठ पट  जास्त, तसेच राज्याने ५६ नवीन योजना आणि ३२  चालू  प्रकल्पांसाठी मंजूर केलेली रक्कम ही जवळपास  पाचपट आहे.
दोन पाइपलाइन प्रकल्पांच्या अनुमानित खर्चापेक्षा (१०. ९० अब्ज रुपये) दुप्पट जास्त. प्रथम, कदाना जलाशयावर आधारित एक प्रकल्प जो दाहोद आणि महीसागर जिल्ह्यात १०,००० हेक्टर सिंचन करेल. दुसरे म्हणजे, दिनोद-बोरिद्रा  लिफ्ट सिंचन प्रकल्प, जो सुरत जिल्ह्यात १,८०० हेक्टरपर्यंत सिंचन देईल.
प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेत,  गुजरात सरकारद्वारे केंद्र सरकारला सादर केलेल्या प्रस्तावांसाठी अंदाजे रक्कमेक्षा  (११. १४ अब्ज रुपये) दुप्पट.  या प्रकल्पांमध्ये  ४०,१९२ हेक्टर जमीन सिंचनाखाली  येईल.  १६२ किरकोळ सिंचन योजनांची पुनर्रचना, दुरुस्ती, आणि नूतनीकरण होईल तसेच ४२५ लहान  पाटबंधाऱ्यांचे बांधकाम होईल.
काय होईल एवढ्या पैशात 
देशात जर दोन नवीन आयआयटी संस्था आणि त्याचा उत्तम परिसर बांधायचा असल्यास त्याकरिता ११. ६७  अब्ज रुपये खर्च  होऊ शकतो .
दोन एम्स रूग्णालय  आणि उत्तम परिसर बांधण्याचा अंदाजे खर्च ११. ०३ अब्ज रुपये.
पाच नवीन कायमस्वरुपी आयआयएम उत्तम परिसराचा विचार केल्यास त्याकरिता  ५. ३९  अब्ज रुपये खरंच येऊ शकतो .
 प्रत्येकी ७५ मेगावॅट्स विजेचे उत्पादन देणारे पाच नवीन सौर ऊर्जा प्रकल्प बांधण्याचा खर्च ५. २८ अब्ज रुपये .
 स्टॅच्यू ऑफ युनिटी’ च्या बांधकामात  इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या सहा मंगळ मोहीमा झाल्या असत्या  (एक मोहिमेचा खर्च  ४. ५० अब्ज रुपये येतो)
५००० विद्यार्थ्यांच्या केजी पासून पीजी पर्यंत शिक्षणाचा खर्च  ,खाणे -पिणे  एवढे सगळे  या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ च्या बांधकामाच्या खर्चात आला आसता जेणेकरून त्यांचे भविष्य उजवळ झाले असते . याचा खर्चात जवळपास ६००० पेक्षा जास्त शाळा बांधता आल्या असत्या .
एवढ्या खर्चात ६००० कोटी पुस्तके भारतभर पोहचली असती –
बाळ राज कृष्णा लिखित  “द आयर्न मन ऑफ इंडिया -सरदार बल्लभभाई पटेल ”  या  पुस्तकाची सध्याची किंमत ५०० रुपये आहे. या पुतळ्यासाठी तब्बल  २  जार ९८९ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हया खर्चात ६००० कोटी पुस्तके भारतभर पोहचली असती . यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान लोकांपर्यंत पोहचले असते , अशी प्रतिक्रिया आकाश खराडे या पुणेकराने  दिली .
पुतळयांवरून राजकारण –
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’असो किंवा शिवाजी महाराजांचा आरबी समुद्रातील पुतळा असो देशात सध्या पुतळ्यांवरून फक्त राजकारण होत आहे.  ज्या थोर व्यक्तींचे पुतळे बांधले जात आहेत त्यांच्याविषयी ,त्यांचे विचार किती लोकांना माहिती आहेत हे तपासणे आवश्यक आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जिथे बांधला गेला तिथल्या स्थानिक लोकांपर्यंत खरा विकास पोहचलेलाच नाही. आजही तिथे मूलभूत गरजांची कमतरता आहे. मग अशा ठिकाणी जगातील सर्वात उंच पुतळा बांधून काय फायदा ? ज्या छत्रपती शिवरायांनी ऐतिहासिक किलले बांधले आहेत त्यांची दुरावस्था झाली आहे त्यांचे जतन करणे आवश्यक आहे.  हे भव्य दिव्य पुतळे म्हणजे कुठेतरी जनतेच्या पैशाचा चुराडा आणि राजकारण आहे ,  अशी  प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी दिली.