Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर ब्रिटनच्या सरकारनं ‘या’ खास 15 लाख लोकांना 3 महिन्यांपर्यंत घरातच राहण्यासाठी सांगितलं

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसने युरोपमधील सर्व देशांमध्ये खळबळ उडवली आहे. इटली, स्पेन, जर्मनी आणि फ्रान्स यांना सर्वात जास्त धक्का बसला आहे, तर ब्रिटनमध्ये याचे ५००० पेक्षा जास्त संक्रमित प्रकरणे समोर आली असून आतापर्यंत २३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे ब्रिटनने १५ लाख लोकांना ३ महिने घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे.

या १५ लाख लोकांमध्ये ते सगळे आहेत ज्यांना हाडांचा कर्करोग, ब्लड कॅन्सर, सिस्टिक फायब्रोसिस सारखे घटक आजार आहेत. याशिवाय ज्यांनी अलीकडेच अवयव प्रत्यारोपण केले आहे त्यांनाही कोरोनापासून बचाव करण्यासाठी ३ महिने घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. कम्युनिटी सेक्रेटरी रॉबर्ट जेनरिकने एका विधानात म्हटले की, लोकांनी घरात राहिले पाहिजे, NHS (मेडिकल सर्व्हिस) ला वाचवा ज्याने जीव वाचेल.

‘ज्या लोकांना धोका आहे, त्यांनी बाहेर पडू नका’
रॉबर्ट यांनी म्हटले की, सरकारने पहिलेच सांगितले आहे कि पहिल्यापासून आजारी लोकं ज्यांचा धोका आणखी वाढू शकतो, त्यांनी जास्त सावधान राहावे. वैज्ञानिकांनी आणि डॉक्टरांनी मिळून अशा लोकांची ओळख पटवली आहे, ज्यांना इतरांच्या तुलनेत कोरोना व्हायरसचा धोका अधिक आहे. अशा लोकांना कमीत कमी १२ आठवड्यांसाठी घरात राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

फोनवरून मागवा घरातील सामान, बाहेर पडू नका
ब्रिटन प्रशासनाने लोकांना घरातून बाहेर न पडण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. सोबतच घरातील महत्वाचे सामान खरेदी करण्यासाठी फोन नंबर जारी केला आहे, जिथून सगळ्या ऑर्डर मागवल्या जाऊ शकतात. इंग्लंडचे डायरेक्टर ऑफ पब्लिक हेल्थ पॉल जॉनस्टन यांनीही एक एडव्हायजरी जारी केली असून शॉपिंग किंवा फिरण्यासाठी घरातून बाहेर न पडण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.