तणावामुळं पोटाचे ‘हे’ विकार होतात का ? ‘ही’ घ्या काळजी

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अनेकदा आपण काही कारणास्तव तणावात असतो. याचा अनेकदा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो. कारण तणाव वाढल्यास पोटात आम्ल वाढू लागतं. यामुळं अपचन होतं आणि मळमळ वाढू लागते. इतकंच नाही तर अतिसार आणि बद्धकोष्ठता अशा समस्याही येऊ शकतात. यामुळं छातीत जळजळ, सूज येणं, पेप्टिक अल्सर, गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डीसीज (जीईआरडी) आणि आतडी सिंड्रोम (आयबीएस) होऊ शकतो. त्यामुळं आपण आता तणाव कमी करण्यासाठी काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

1) संतुलित आहाराचं सेवन करा – आपल्या आहारात ताजी फळं, भाज्या सर्व कडधान्ये आणि धान्यांचा समावेश असणं गरजेचं आहे. तसंच आहारात फायबरयुक्त आहार घेणं गरजेचं आहे. शीतपेय, मसालेदार पदार्थ, जंक फूड किंवा तेलकट पदार्थांपासून दूर रहा. तसंच प्रोबायोटीक्स खाणं उपयुक्त ठरू शकतं. कारण हे आपल्या आतड्यांच्या बॅक्टेरियांना दूर करण्यात मदत करते तसंच पचनक्रिया वाढवते. हायड्रेट रहा आणि भरपूर पाणी द्या. असं केल्यानं पचनास मदत होते. मद्यपान तसंच धूम्रपान करू नका. या व्यसनांमुळं पाचन तंत्रावर परिणाम होऊ शकतो आणि बद्धकोष्ठतादेखील होऊ शकतो. जास्त काळ उपाशी राहू नका आणि भूक नसताना खाऊ नका.

2) दररोज व्यायाम करा – व्यायाम करणं हे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही दृष्टीनं फायदेशीर आहे. त्यामुळं व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायाम केल्यामुळं आतड्याचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल. तसंच ध्यान आणि योग यांच्या माध्यमातून मनाचं आरोग्य जपलं जाईल.

3) ताण किंवा तणाव निर्माण होण्याचं मूळ कारण शोधा – तुम्हाला कायमच ताण तणावाची समस्या येत असेल तर त्याचं मूळ कारण शोधा. यातून मार्ग काढण्यासाठी समुपदेशन देखील फायदेशीर ठरू शकतं.

4) आनंदी रहा – जास्तीत जास्त काळ आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. तणामुक्त होण्यासाठी चित्रकला, संगीत ऐकणं, वाचन किंवा बागकाम करणं असे छंद जोपासू शकता. आपल्या कुटुंबातील सदस्यांशी किंवा मित्रांशी मनमोकळ्या गप्पा मारून मानसिक ताणतणावाला दूर ठेवणं शक्य आहे.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.