home page top 1

जैशचा म्होरक्या दहशतवादी मसूद अझरच्या समर्थनार्थ काश्मीरमध्ये घोषणाबाजी, पोलिसांवर दगडफेक

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. जैशचा म्होरक्या मसूर अझर आणि चकमकीत मारला गेलेला दहशतवादी झाकीर मुसा याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये रमजान ईदचा उत्साह आहे. मात्र श्रीनगरमधील जामा मशि‍दीजवळ या उत्साहाला गालबोट लागले आहे. काही तरुणांनी चकमकीत मारला गेलेला दहशतवादी झाकीर मुसा, आणि जैशचा म्होरक्या मसूद अझर यांचे छायाचित्र असलेले पोस्टर्स घेऊन हे तरुण जामा मशीदीजवळील दुकानाजवळ जमले. त्यांनी रस्त्यात थांबून घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ते दाखल होताच सुरक्षा दलाच्या जवानांवर टोळक्याने दगडफेक करण्यास सुरुवात केली. यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला. त्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काश्मीर बनेगा पाकिस्तानचे पोस्टर

काश्मीर बनेगा पाकिस्तान, मुसा आर्मी, इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू काश्मीर असा मजकूर असलेले फलक हातात घेऊन तरुणांनी घोषणाबाजी केली.

पुलवामा येथे एका महिलेची गोळीबार करून हत्या

दहशतवाद्यांनी पुलवामा येथे एका महिलेवर गोळीबार करून तिची हत्या केली. नगीनाजन असे या महिलेचे नाव आहे. दोन वर्षांपुर्वी तिच्या पतीची म्हणजेच मोहम्मद युसुफ लोन याचीदेखील अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती.

 

Loading...
You might also like