‘कबीर सिंह’चं स्क्रिनिंग थांबवा : ‘या’ डॉक्टरांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शाहिदचा कबीर सिंह नुकताच रिलीज झाला आहे. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. अशातच आता या सिनेमाचे स्किनिंग थांबवण्याची मागणी डॉ. प्रदीप गाडगे यांनी केल आहे. या सिनेमांमुळे डॉक्टरी पेशाची आणि डॉक्टरांची प्रतिमा मलीन होत आहे असा आरोप डॉ. प्रदीप गाडगे यांनी केला आहे. डॉ. प्रदीप गाडगे यांनी या संदर्भात राज्य आणि केंद्रीय आरोग्य मंत्री, माहिती प्रसारण मंत्री तसंच सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिले आहे आणि कबीर सिंहची स्क्रिनिंग थांबवण्यात यावी अशी मागणी केली आहे.

…म्हणून घेतला सिनेमावर आक्षेप

कबीर सिंह या सिनेमात शाहिद कपूरची मुख्य भूमिका आहे. कबीर सिंह हेच त्याच्या पात्राचे नाव आहे. जो व्यवसायाने डॉक्टर आहे. सिनेमात दिसतं की, शाहिदचं म्हणजेच कबीर सिंहचं आपल्या डॉक्टरी पेशावर खूप प्रेम आहे. परंतु काही सीन्समध्ये कबीर दारु पिताना दिसत आहे. इतकेच नाही तर, काही सीन्समध्ये तो अंमली पदार्थाचेही सेवन करताना दिसत आहे. याच सीन्सबाबत प्रदीप गाडगे यांचा आक्षेप आहे. असे समजत आहे. त्यामुळेच त्यांनी स्क्रिनिंग थांबवण्याची मागणी केली आहे.

७०.८३ कोटींचं ओपनिंग विकेंड कलेक्शन

कबीर सिंह शाहिदच्या करिअरमधलील सर्वात मोठा ओपनिंग सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने एकूण ८८.३७ कोटी कमावले आहेत. या सिनेमाने पहिल्या दिवशी २०.२१ कोटी कमावले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २२.७१ कोटी कमावल. अशा प्रकारे केवळ दोनच दिवसात या सिनेमाने ४२.९२ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या सिनेमाने २७.९१ कोटींची बंपर कमाई केली. चौथ्या दिवशी १७.५४ कोटींची कमाई करत कबीर सिंहने ७०.८३ कोटीचं ओपनिंग विकेंड कलेक्शन केलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’