पूर्वांचलचा ‘डॉन’ मुन्ना बजरंगी हत्याकांडाचा CBI तपास होणार, अलाहाबाद हायकोर्टाचा आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलाहाबाद उच्च न्यायालयाने शार्प शूटर मुन्ना बजरंगी मर्डर केसचा तपास सीबीआयकडे देण्याचा आदेश दिला आहे. झाशीहून बागपत जिल्हा तुरुंगात नेताना मुन्ना बजरंगीवर गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. 20 एप्रिलला तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

हा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायधीश सुधीर अग्रवाल आणि न्यायाधीश राजीव मिश्र यांच्या पीठाने मुन्ना बजरंगीच्या पत्नी सीमा सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान दिला आहे.

सुनावणी दरम्यान न्यायालयाने सांगितले की झाशीमधून बागपतला नेणे आणि त्याच दिवशी तुरुंगात पिस्तुल येण्यामागच्या षडयंत्रामुळे अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा तपास केला जाईल. तसेच पिस्तुलच्या बॅलिस्टिक तपास करुन हत्येत वापरण्यात आलेल्या पिस्तुलाची ओळख करण्याचे देखील सांगितले आहे.

9 जुलै 2018 ला झाली होती हत्या –
जवळपास दीड वर्षांपूर्वी जुलैमध्ये बागपत तुरुंगात पूर्वांचलचा डॉन मुन्ना बजरंगीची गोळी झाडून हत्या करण्यात आली परंतु अद्यापही हत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. मुन्ना बजरंगीला माजी आमदार लोकेश दीक्षित द्वारे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात झासी तुरुंगातून हजर करण्यासाठी नेले गेले होते.

रात्रभर सुनील राठीसह राहणाऱ्या मुन्ना बजरंगीची 9 जुलैला सकाळी गोळ्या घालून हत्या केली गेली. या प्रकरणी तत्कालीन जेलर यूपी सिंह सह तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली.