ICC World Cup 2019 : ‘त्या’मुळे मॅचआधीच ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत वाढ

लंडन : वृत्तसंस्था – विश्वकप २०१९ ला सुरुवात झाली असून आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. १ वर्षाची बंदी उठवल्यानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचे फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय सामन्यात खेळणार आहे. त्यामुळे या दोघांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. परंतु या मॅचआधी ऑस्ट्रेलियाच्या चिंता वाढल्या आहेत.

डेव्हिड वॉर्नर फिट झाला तरच ही मॅच खेळणार असल्याचं ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सांगितलं. डेव्हिड वॉर्नरच्या कंबरेतल्या मांसपेशींना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वॉर्नर फिट होण्यासाठी मेहनत करत आहे. परंतु १०० टक्के फिट झाल्याशिवाय तो खेळणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

यजमान इंग्लंड आणि विंडीज यांनी या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली असल्याने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान दोघेही विजयासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होईल असे म्हटले तर वावघे ठरणार नाही.

ऑस्ट्रेलिया संघ

एरॉन फिंच (कॅप्टन), जेसन बेहरनडॉर्फ, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), नॅथन कॉल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नेथन लॉयन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हि़ड वॉर्नर, एडम झॅम्पा. अशी ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंची नावे आहेत.