ICC World Cup 2019 : इंग्लंडचा केविन पीटरसनच्या मते ‘असं’ होणार सेमीफायनल, ‘या’ २ टीम नक्‍की फायनलमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील आता केवळ तीन सामने शिल्लक असून सर्व जगाचे याकडे लक्ष लागून आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या चार संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असून आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनाचा सामना रंगणार असून यात जिंकून कोण फायनलमध्ये प्रवेश करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. क्रिकेट जाणकार आणि पंडित यामध्ये आपले अंदाज बांधत असून स्वतःचे आवडते संघ त्यांनी निवडले असून कोण फायनलमध्ये प्रवेश करणार याची भविष्यवाणी वर्तवत आहेत.

यानंतर आता इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने या विषयावर भविष्यवाणी वर्तवली आहे.
काल दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू फाफ-डू-प्लेसिस याने हि वर्ल्डकप स्पर्धा कोण जिंकणे याचे भाकीत वर्तवले होते. आज पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनल होणार असून ११ जुलै रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी सेमीफायनल होणार आहे. या स्पर्धेत फायनलमध्ये कोण खेळणार याविषयी भाकीत करताना पीटरसन म्हणाला कि,पहिल्या सामन्यात भारत न्यूझीलंडला पराभूत करून आणि दुसऱ्या सामन्यात इंग्लंड ऑस्ट्रेलियाला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश करेल. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना हा भारत आणि इंग्लंड यांच्यात होईल, असे त्याने म्हटले आहे.

https://twitter.com/KP24/status/1147602245942435840

तर भारत थेट अंतिम फेरीत

जर दोन्हीही दिवशी पाऊस पडला तर याचा सर्वात जास्त फटका कुणाला बसणार याची सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे या दोन संघांपैकी कोण फायनलला जाणार यावर सोशल मीडियावर देखील चर्चा सुरु आहे. साखळी सामन्यांमध्ये ज्याने चांगले प्रदर्शन केले आहे त्याचा उपयोग या संघाना याठिकाणी होऊ शकतो. यामुळे पाऊस पडला तरीदेखील भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे.

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर