आयपीएलबाबत स्टेनच्या वक्तव्याला अजिंक्य रहाणेने दिले रोखठोक प्रत्युत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) बाबत दक्षिण अफ्रीकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने काही दिवसापूर्वी असे वक्तव्य केले ज्यावरून वाद निर्माण झाला. आयपीएलमध्ये भारतच नव्हे, जगातील सुद्धा अनेक अनकॅप्ड आणि तरूण क्रिकेटर्सना आपले टॅलेंट दाखवण्याची संधी मिळते. यावर्षी आयपीएलमधून नाव माघारी घेणारा स्टेन सध्या पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये खेळत आहे. स्टेनने म्हटले की, पीएसएल आणि लंका प्रीमियर लीग (एलपीएल) खेळाडूंसाठी जास्त रिव्हॉर्डिंग आहे. टीम इंडियाचा टेस्ट उप कर्णधार अजिंक्य रहाणेने स्टेनच्या या दाव्याला उत्तर दिले आहे.

रहाणेला जेव्हा याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, पहा, मी येथे चौथ्या टेस्ट मॅचबाबत बोलण्यासाठी आहे, एलपीएल आणि पीएसएलबाबत बोलण्यासाठी नाही. आयपीएलने आपल्या सर्वांना असा प्लॅटफॉर्म दिला आहे, ज्यामध्ये भारतीय क्रिकेटर्सना स्वत:ला एक्सप्रेस करण्याची संधी मिळाली आहे. मला खरोखर माहिती नाही की डेल स्टेनने काय म्हटले आहे. मी येथे टेस्ट मॅचबाबत बोलण्यासाठी आहे.

स्टेन सध्या क्वेटा ग्लॅडिएटर्ससाठी खेळत आहे. या दरम्याने रहाणेने सांगितले की, उमेश यादव चौथ्या टेस्टसाठी पूर्णपणे फिट आहे. तो खुप चांगला दिसत आहे, आणि खुप चांगली गोलंदाजी करत आहे. नेट्सवर त्याचे सेशन खुप चांगले होते. आम्ही आनंदी आहोत की तो परत आला आहे. तसेच रहाणेने म्हटले की, टीमची नजर ड्रॉ वर नव्हे तर टेस्ट जिंकण्यावर असेल. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचण्यासाठी कमीत कमी ही टेस्ट ड्रॉ करावी लागेल.