NSCL Recruitment 2020 : 12 वी पास ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतच्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएससीएल) ने अनेक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे एनएससीएल मॅनेजमेंट ट्रेनी, असिस्टंट, सीनियर ट्रेनी आणि डिप्लोमा ट्रेनीसह अनेक रिक्त पदे भरणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार विभागाची ऑफिशियल वेबसाइट indiaseeds.com वर जाऊन शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. एनएससीएलने 31 पदांवर एकुण 220 व्हॅकन्सीज काढल्या आहेत.

उमेदवारांना सल्ला देण्यात येत आहे की, अर्ज करतेवेळी मागण्यात येणार्‍या डिटेल्स लक्षपूर्वक भरा, कारण कोणतीही गडबड झाल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट आहे.

पात्रता –
या भारतीसाठी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि 12वी पाव असलेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात.

निवड प्रकिया –
योग्य उमेदवारांची निवड लेखी परीखेत प्राप्त गुणांच्या मेरिट लिस्टच्या आधारावर होईल. लेखी परीक्षेत पास होणार्‍या उमेदवारांना इंटरव्ह्यू किंवा डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येईल. एनएससीच्या ऑफिशियल नोटिफिकेशननुसार, उमेदवाराला सीलेक्शनमध्ये लेखी परीक्षेत 70 टक्के आणि इंटरव्ह्यूत 30 टक्के गुण जोडले जातील.

नोटिफिकेशननुसार, मॅनेजमेंट ट्रेनीची सेवा मॅनेजर पद्धतीने घेतली जाईल. तर ट्रेनी फील्डच्या कामावर सुपरवाईज करतील. अन्य पोस्ट ऑफिस आणि फील्ड दोन्हीसाठी आहेत.

भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवार ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकतात. याशिवाय अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाइटवर जावे.