उद्यापासून बदलणार कॉलिंगसंबंधी ‘हा’ नियम, लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्यासाठी लावावा लागेल ’0’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   कॉलिंगशी संबंधीत मोठा नियम 15 जानेवारी म्हणजे उद्यापासून बदलणार आहे. आता लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्यासाठी तुम्हाला ’0’ लावावा लागेल. वेगाने संपत असलेल्या मोबाइल नंबर सीरीजचा विचार करता दूरसंचार विभागाने कॉलिंगच्या एका मोठ्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. DoT ने लँडलाइनवरून मोबाइलवर डायलवर कॉल करण्यासाठी झिरो लावणे अनिवार्य केले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने अशाप्रकारच्या कॉलसाठी 29 मे 2020 ला नंबरच्या अगोदर ‘शून्य’ (0) लावण्याची शिफारस केली होती. यामुळे टेलिकॉम कंपन्यांना जास्त नंबर बनवण्याची सुविधा मिळू शकते.

इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, भारती एयरटेलने बुधवारी ग्राहकांना याबाबत सूचित केले आहे. कंपनीने म्हटले की, डॉटच्या निर्देशानुसार 15 जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाइल नंबर डायल करण्यापूर्वी तुम्हाला झीरो लाववा लागेल. अपेक्षा आहे की, वोडाफोन आयडिया, रिलायन्स जिओ, बीएसएनएलने सुद्धा या नियमाबाबत आपल्या युजर्सला कळवले असेल. या कंपन्यांनी याबाबत कोणतेही उत्तर दिलेले नाही.

हा नियम लागू केल्यानंतर सरकारला अपेक्षा आहे की, जवळपास 2,539 मिलियन नंबरिंग सीरीज तयार होतील. ज्या मोठ्या प्रमाणात मोबाइल ग्राहकांसाठी उपयोगी होतील. 20 नोव्हेंबरला दूरसंचार विभागाने एका सर्क्युलरमध्ये सांगितले आहे की, लँडलाइनहून मोबाइलवर नंबर डायल करण्याच्या पद्धतीत बदलाच्या ट्रायच्या शिफारसी मंजूर झाल्या आहेत. या सर्क्युलरनुसार, नियमांना लागू केल्यानंतर लँडलाइनहून मोबाइलवर कॉल करण्यासाठी नंबरच्या अगोदर शून्य डायल करावा लागेल.