ऑनलाइन क्लासदरम्यान अभ्यास नको म्हणून विद्यार्थ्याने अशी लढवली शक्कल, लोक म्हणाले – ‘हा तर जीनियस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या जीवनात अनेक बदल झाले आहेत. खुप काही नवीन सुद्धा पहायला मिळाले आहे. राहण्याच्या पद्धतीपासून मुलांच्या शिक्षणापर्यंत सगळीकडे परिवर्तन आले आहे. या पार्श्वभूमीवर एका विद्यार्थ्याने ऑनलाइन क्लासच्या दरम्यान जे केले त्यामुळे तर सर्वजण हैराण आहेत. इतकेच नव्हे, सोशल मीडियावर लोक त्याला आता ‘जीनियस’ म्हणत आहेत. हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेवूयात…

कोरोना काळात ऑनलाइनचा वापर खुप वाढला आहे. जगभरातील मुलं ऑनलाइन क्लासमध्ये शिकत आहेत. ट्विटर यूजर क्रीस अरनॉल्ड यांनी यासंबंधी एक प्रकरण सोशल मीडियावर शेयर केले आहे, जे चर्चेचा विषय झाले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांची पत्नी शिक्षिका आहे आणि सध्या मुलांचे ऑनलाइन क्लास घेत आहे. या दरम्यान एका मुलाने जे केले त्यामुळे त्यांची पत्नी हैराण झाली. क्रिस यांनी सांगितले की, ऑनलाइन क्लासच्या दरम्यान अभ्यास टाळण्यासाठी एका विद्यार्थ्याने आपल्या झूम स्क्रीनचे नाव बदलून ‘Reconnecting…’ केले, जेणेकरून त्याला कोणताही प्रश्न विचारला जाऊ नये.

त्यांनी सांगितले जवळपास एक आठवडा हे प्रकरण सुरू होते. क्रिस यांनी सांगितले की, अगोदर त्यांच्या पत्नीला वाटले की, स्क्रीनमध्ये काहीतरी गडबड आहे, परंतु सत्य समारे आल्यानंतर त्या हैराण झाल्या. हे प्रकरण जेव्हा सोशल मीडियावर शेयर केले गेले तेव्हा लोकांनी याची खुप मजा घेतली. अनेक प्रकारच्या कमेंट सुद्धा लोक करत होते. इतकेच नव्हे, काही यूजर्सने तर म्हटले की, हा मुलगा तर अगोदरपासूनच ‘जीनियस’ आहे.