अहमदनगर : सावेडी जॉगींग पार्क भाड्याने देऊ नका, विद्यार्थ्यांचा मनपा सभेवर मोर्चा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सावेडी उपनगरातील जॉगींग पार्क हे मनपा भाड्याने देत असल्याने त्या मैदानाची दुरवस्था झाली आहे. हे मैदान खेळण्यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे महानगरपालिकेने हे मैदान भाड्याने देऊ नये, यासाठी नगरसेवक महेंद्र गंधे यांच्या नेतृत्वाखाली आज मनपा सर्वसाधारण सभेवर समर्थ शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह मोर्चा आणला होता.

यावेळी नगरसेवक मनोज दुलम, नगरसेविका आशा कराळे उपस्थित होत्या. यापूर्वी अनेक वेळेस याबाबत आम्ही मनपाकडे व नगरविकास खात्याकडे पाठपुरावा केला आहे. हा गंभीर विषय सर्वानुमते मंजूर करावा, अशी मागणी नगरसेवक महेंद्र गंधे यांनी जनरल बोर्डमध्ये केल्यानंतर सावेडी जॉगींग पार्क हे महानगरपालिका मोजक्याच ३–४ कार्यक्रमाला नियम व अटीच्या तत्वावर देण्यात येईल. इतर कोणालाच देण्यात येणार नाही, असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितल्यावर या निर्णयानुमते सर्व नगरसेवकांनी या विषयाला मंजुरी दिली.

या निर्णयाचे सावेडी उपनगरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. विविध फेस्टिव्हलला हे मैदान दिल्याने नागरिकांची गैरसोय होत होती.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like