‘मला पास करा, नाहीतर आत्महत्या करेन’,बारावीच्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिकेतून धमकी

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावीच्या इंग्रजीच्या उत्तरपत्रिकेत एका विद्यार्थांने मला पास करा, नाहीतर मी आत्महत्या करेन असा धमकीवजा इशारा लिहला होता. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. कोकण बोर्डात हा अजब प्रकार घडला आहे.

या अजब प्रकाराबरोबरच कोकण बोर्डात आणखी काही प्रकार समोर आले आहेत. एका विद्यार्थ्यांने पेन्सिलने उत्तरपत्रिकेवर लिहिल्याचे आढळून आले. मात्र मंडळाच्या परीक्षेत पेनानेच लिहिलेली उत्तर ग्राह्य धरली जात असल्यामुळे पेन्सिलने लिहिलेला उत्तरांना गुण दिले गेले नाहीत.

परीक्षा कॉपीमुक्त करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी कॉपीबहाद्दर निरनिराळ्या आयडिया वापरून कॉपी करतच आहेत. एकेकाळी कॉपीमुक्त कोकण बोर्डात यंदा कॉपीचे तीन प्रकार घडले होते.