Sudamrao Landge Passed Away | पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर सुदामराव लांडगे यांचे निधन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर (Former Deputy Mayor of Pimpri-Chinchwad) सुदामराव हिरामणराव लांडगे Sudamrao Landge Passed Away (६७) यांचे निधन झाले आहे. ते भाजपाचे युवा नेते शिवराज लांडगे (BJP youth leader Shivraj Landge) यांचे वडील तर भोसरीचे आमदार महेश लांडगे (Bhosari MLA Mahesh Landge) यांचे काका होत. ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) २००४ मध्ये नगरसेवक म्हणून निवडूण गेले. त्यानंतर उपमहापौर म्हणून त्यांची निवड झाली होती. (Sudamrao Landge Passed Away)

सुदामराव लांडगे यांच्या पार्थिवावर भोसरीतील स्मशानभूमीमध्ये मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक तसेच विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सुदामराव लांडगे यांच्या निधनाबद्दल (Sudamrao Landge Passed Away) शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये आमदार लांडगे यांनी म्हटले आहे की, माझे चुलते पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर सुदामराव लांडगे यांचे आकस्मित निधन झाले.

माझा सहकारी आणि भाजपा युवा नेते शिवराज लांडगे यांचे ते वडील होत. शहराच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात
त्यांनी योगदान दिले आहे. त्यांचे अचानक जाणे मनाला चटका लावणारे आहे.
माझ्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
लांडगे कुटुंबियांचा आणखी एक मार्गदर्शक हरपला आहे, असे आमदार लांडगे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, ”मराठी आणि हिंदुत्त्वाबद्दल फक्त तोंड वाजवायचं, नुसतं बाळासाहेबांचे विचार…”

CM Eknath Shinde | CM शिंदेंकडून भुजबळांच्या मागणीचे समर्थन, म्हणाले – ”तीच भूमिका सरकारचीही आहे…”