MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, ”मराठी आणि हिंदुत्त्वाबद्दल फक्त तोंड वाजवायचं, नुसतं बाळासाहेबांचे विचार…”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – MNS Chief Raj Thackeray | सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानंतर सुद्धा राज्यातील अनेक दुकानदारांनी मराठीत पाट्या केलेल्या नाहीत. यामुळे मुंबई, ठाण्यासह पुणे जिल्ह्यात मनसैनिक आक्रमक झाले आहेत. याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला. पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले, मराठी आणि हिंदुत्त्वाबद्दल फक्त तोंड वाजवायला आपले सरकार आहे. नुसते बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे विचार म्हणायचे. कोर्टाने सांगूनही सरकारला मराठी पाट्यांची सक्ती करता येत नाही. यापूर्वी मी मशिदींवरील भोंगे काढायला सांगितले होते, तेही काढता आले नाहीत. नुसते बोलायचे बाळासाहेबांचे विचार, मग बाळासाहेबांचे विचार अमलात आणा ना.

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) म्हणाले, आम्ही मराठी पाट्यांचे आंदोलन केले होते तेव्हा मराठीत पाट्या लागल्या होत्या ना. आता, शासनाचा धाक नावाची काही गोष्ट आहे की नाही. कोर्टाची भीती नाही, पोलिसांची भीती नाही, शासनाची भीती नाही. मग, आपण अराजकतेकडे जाऊ.

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्यातील दुकाने आणि आस्थापना यावरील पाट्या मराठी भाषेत ठळक अक्षरात लावा,
सरकारच्या कायद्याचे पालन करा असे निर्देश दिले आहेत. त्यासाठी, व्यापारांना २ महिन्यांची मुदत दिली होती.
ही मुदत संपली असून अनेक दुकानदारांनी मराठी भाषेत पाट्या लावलेल्या नाहीत. त्यामुळे, काही शहरांत मनसेने
आक्रमक पवित्रा घेत पाट्या फोडल्या. याबाबत राज ठाकरे यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जहरी टीका, ”असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक”

Ajit Pawar Group | अजित पवार गटाचे विधीमंडळाच्या नोटिसीला 260 पानी उत्तर, राष्ट्रवादी पक्ष आमचाच असल्याचा केला दावा

Pune Pimpri Crime News | पिंपरी : गहुंजेत कोयता गँगची दहशत, घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या; दोघांना अटक