नथुराम गोडसेचा जन्म बारामतीत झाला हे दुर्देव : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरु असून या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलेले पाहायला मिळून येत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल अर्थसंकल्पावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्याचबरोबर त्यानी विरोधकांना देखील उत्तरे देऊन त्यांच्यावर टीका केली.

त्यानंतर झालेल्या चर्चेत अर्थसंकल्पात राज्य सरकारने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जी तरतूद केली होती त्यावर विरोधकांनी  सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. त्यावर आज सुधीर मुनगंटीवारांनी उत्तर देताना नथुराम गोडसेचा जन्म हा बारामतीत झाला हे दुर्दैव आहे असे म्हणत  त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टोला लगावला.

याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले कि,नथुराम गोडसे यांचा जन्म बारामतीचा आहे हे दुर्दैव आहे. माझ्याकडे प्रमाणपत्र नाही, इंटरनेटवर आहे त्याचे प्रिंट आऊट काढा. मी १०१ टक्के सांगतो त्यांचा जन्म हा बारामतीतच झाला आहे. महात्मा गांधीनी स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात जास्त काळ महाराष्ट्रात  व्यतित  केला  होता, त्यामुळे त्यांचा आदर आणि सन्मान करणे महाराष्ट्राचे कर्तव्य आहे.

गवालिया टँकवर चलेजावच्या आंदोलनाचा स्तंभ उभा केलाय आणि त्यावर कमळाचं फूल आहे. त्याचबरोबर त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच या आर्थिक वर्षात कोणत्याही योजनेसाठी निधी कमी पडणार नाही याची हमीदेखील त्यांनी दिली.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या कवितेलाही त्यांनी उत्तर दिले. जयंत पाटील यांनी झिंग झिंग झिंगाट हि कविता सादर केल्यानंतर त्यांनी म्हटले कि, उरात होते धडधड सत्ता जायची वेळ आली अशी तुमची कविता होती. आमच्या उरात धडधड होत नाही. त्यांच्याच उरात होते धडधड ज्यांची क्षणात सत्ता गेली. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत कोण कुणावर भारी पडते हे पाहणे महत्वाचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त – 

रात्री २ विलायची खाऊन १ ग्लास गरम पाणी प्या ; होईल ‘ही’ कमाल

हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार

कप ग्रीन टी नियमित घेतल्यावर होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय