…अन् ट्रोलिंगला कंटाळून सुहानाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Bollywood actor ShahRukh Khan) याची लेक सुहाना खान (Suhana Khan ) ही बऱ्याच वेळा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. कधी तिच्या कपड्यांवरुन तर कधी तिच्या स्टाइल स्टेटमेंटवरुन. मात्र, यावेळी सोशल मीडियावरील ट्रोलिंगला कंटाळून सुहानाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिने चक्क तिच कमेंट सेक्शन बंद (Comment section closed) केले आहे.

यामुळे तिच्या कोणत्याही फोटोवर कुणालाही कमेंट करता येणार नाही. सुहानाला बर्‍याच वेळा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. बर्‍याचवेळा सुहाना सोशल मीडियावर एखादा फोटो किंवा व्हिडिओ शेअर करते तेव्हा काही नेटकरी कमेंट करून तिला ट्रोल करतात. आता या सगळ्याला कंटाळून तिने एक निर्णय घेतला आहे.

सुहानाने तिच कमेंट सेक्शन बंद केल आहे. दरम्यान, एकीकडे ट्रोलिंगला कंटाळून तिने कमेंट सेक्शन बंद केल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे मात्र, अभ्यासवर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी यासाठी तिने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.