Photos : सुहाना खानची कझिन आलिया छिब्बा नेमकी आहे तरी कोण ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) यानं नुकताच दुबईत त्याचा 55 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी शाहरुखची पत्नी गौरी (Gauri Khan) खान हिचा भाऊ विक्रांत छिब्बाची मुलगी आलिया छिब्बा (Alia Chhiba) ही देखील उपस्थित होती. सुहाना शाहरुख खान (Suhana Khan) प्रमाणेच आलिया छिब्बा ही देखील सोशल मीडियावर ॲक्टीव्ह असते. अनेकांना तिच्याबद्दल माहिती नाहीये.

आलिया ही गौरी खानची भाची आहे. म्हणजेच सुहाना आणि आलिया दोघी कझिन आहेत. दोघींमध्ये चांगली बाँडिंगही आहे. आलियाचे सोशल मीडियावर अनके ग्लॅमरस फोटो आहेत. ती देखील ग्लॅमरस आयुष्य जगते.

आलियाचा फिल्म इंडस्ट्रीत येण्याचा कोणताही इरादा नाही. ती एक फॅशन डिझायनर आहे. तिला तिचा स्वत:चा फॅशन ब्रँड सुरू करायचा आहे.

आलियानं कोरोनाच्या काळात सॉक्सची लाईन लाँच केली होती. डिझाईनर मास्कही तिनं लाँच केले होते. तिच्या ब्रँडमध्ये अनेक फंकी ॲक्सेसरीज आहेत.

आलियाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती विवाहित आहे. गेल्या वर्षी कोलकात्यात ती विवाबद्ध झाली होती. शाहरुख, गौरी आणि सुहाना असे सगळेच या लग्नाला हजर होते.

https://www.instagram.com/p/CEUS3EpjMAo/

सौंदर्याबद्दल बोलायचं झालं तर तीही कमी सुंदर नाहीये. सोशलवर तिचे अनेक फॉलोवर्स आहेत. सुहानालाही ती लुकच्या बाबतीत टक्कर देते.

https://www.instagram.com/p/ByFo906nMyt/

https://www.instagram.com/p/B7nrZbVHqLb/

https://www.instagram.com/p/B8_o-2fHF3N/

https://www.instagram.com/p/B_F0ibmDCvH/