Suhas Kande | त्यावेळी नक्षलवाद्यांनी शिंदेंना हत्येची धमकी दिली; पण, उद्धव ठाकरेंनी त्यांना झेड प्लस सुरक्षा नाकारली

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – काल ठाणे आणि भिवंडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर आज युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Shivsena Leader Aditya Thackeray) यांनी नाशिककडे आपली शिवसंवाद यात्रा वळवली आहे. ठाकरे यांच्या या शिवसंवाद यात्रेचा (Shiva Samvad Yatra) धसका शिंदे गटाने घेतला असून आता नाशिकमधून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आरोप करणारे वक्तव्य शिवसेनेचे बंडखोर आमदार (Rebel MLA) सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केले आहे. आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या मतदार संघाला भेट देणार आहेत.

 

तत्पूर्वी सुहास कांदे (Suhas Kande) यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना नक्षलवाद्यांनी (Naxalites) त्यांना मारण्याची धमकी (Threat to kill) दिली होती. त्यांना मारण्यासाठी ते ठाणे, मुंबईत आले होते. तसा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence Agencies) सुद्धा दिला होता. पण ठाकरे यांनी त्यावेळी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा (Z Plus Security) व्यवस्था नाकारली होती.

 

हिंदुत्व विरोधकांना सुरक्षा दिली. मात्र हिंदुत्ववाद्यांना का सुरक्षा देण्यात आली नाही. एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका, असा फोन वर्षा बंगल्यावरून शंभूराजे देसाई (Shambhu Raje Desai) यांना आला होता. एकनाथ शिंदेंना सुरक्षा का देण्यात आली नाही, असा प्रश्न मला पडला आहे, असे कांदे यांनी म्हटले.

कांदे यांच्या आरोपानंतर आणखी एका बंडखोराने त्यांच्या आरोपाला दुजोरा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्याची गरज नाही, असा फोन वर्षावरून आल्याचे शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदेंच्या जीविताला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धमदी देणारे पत्र आले होते,
त्यांना सुरक्षा देण्याचे मी सभागृहात जाहीर केले होते. त्यानंतर मी पोलीस अधिकार्‍यांची बैठकही घेतली होती.
त्यानंतर मला वर्षावरून त्यांची सुरक्षा वाढवण्याची गरज नाही, असा फोन आला होता, असे देसाई म्हणाले.

 

दरम्यान, काँग्रेस नेते सतेज पाटील (Congress Leader Satej Patil) यांनी सुहास कांदे यांचे
आरोप फेटाळले असून याबाबतचे निर्णय गृहराज्यमंत्री घेत नाहीत,
तर मुख्य सचिव घेतात, असे म्हटले आहे. मुख्य सचिव सर्व पडताळणी करून कुणाला संरक्षण द्यायचे,
कुणाला नाही हे ठरवतात. त्यामुळे मला या गोष्टीमध्ये काही तथ्य वाटत नाही, असे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

 

Web Title :- Suhas Kande | naxalites then threatened to kill shinde but uddhav thackeray denied him z plus security suhas kandes serious allegation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Yogasana For Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज करावी ही 2 योगासन

 

Deepak Kesarkar | केसरकर आदित्य ठाकरेंवर संतापले; म्हणाले – ‘जरा आपल्या…’

 

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एयरमध्ये (Akasa Air) फ्लाईट बुकिंग सुरू, पहिले उड्डाण 7 ऑगस्टला होणार