Deepak Kesarkar | केसरकर आदित्य ठाकरेंवर संतापले; म्हणाले – ‘जरा आपल्या…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर संघटनेला सावरण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Shivsena Leader Aditya Thackeray) यांनी शिवसंपर्क अभियान (Shiv Sampark Campaign) सुरु केले आहे. या अभियानात आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) जोरदार हल्लाबोल करत आहेत. आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचे (Shinde Group) प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आमदारांवर होणाऱ्या टीकेवरुन संताप व्यक्त केला आहे. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यासोबत यावेळी दादा भुसे (Dada Bhuse), संजय राठोड (Sanjay Rathod) हे उपस्थित होते.

 

धमक्या कोणाला देत आहात…
आदित्या ठाकरे यांचे आव्हान पोकळ आहे. आपल्या भागातील लोकांवर अन्याय होतो त्यावेळी तेथील जनता पेटून उठते. नारायण राणे (Narayan Rane) शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी कोकणावर अन्याय झाला असं लोकांना वाटलं. त्यावेळी श्याम सावंत (Shyam Sawant) सोडले तर सेनेचे सर्व उमेदवार पराभूत झाले होते, हा इतिहास आहे. धमक्या कोणाला देत आहेत. कोणीही घाबरत नाही, असे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.

 

त्यांनी वडिलांचे उदाहरण घ्यावं
आदित्य ठाकरे तरुण आहेत. कसं वागावं, बोलावं यासाठी त्यांनी वडिलांचं उदाहरण घ्यावं. ते जर इतर नेत्यांसारखं बोलू लागले तर हे प्रकरण अजून चिघळेल. ते माझ्यापेक्षा निम्या वयाचे आहेत. पण ते ज्यावेळी येतात तेव्हा मी उठून उभा राहतो. कारण तो त्यांच्या आजोबांचा मान आहे. आम्ही बोलत नाही म्हणजे आमच्याकडे मुद्दे नाहीत असं नाही, अशा शब्दात केसरकरांनी इशारा दिला.

 

तुम्ही कितीही यात्रा काढा…
आम्हा शिवसैनिकांच्या पक्षनिष्ठेवर शंका घेणं आमच्या मनाला लागलं आहे. तुम्ही कितीही यात्रा काढा, लोकांच्या मनात कितीही संभ्रम निर्माण करा. आमची शिवसेना खरी असल्याचा दावा केसरकर यांनी केला. तसेच लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केल्याचा प्रयत्न केला तर आम्ही बोलणार असे ते म्हणाले.

त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात अश्रू आले
शिवसेना बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेब (Balasaheb Thackeray) एकवचनी होते. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचं वचन दिलं गेलं होतं, ही वस्तुस्थिती आहे. पण ते मिळालं नाही म्हणून त्यांनी बंड केलं नाही, ते शांत राहिले. आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) भेटायला बोलावलं होतं आणि माझं मुख्यमंत्रीपद (CM) तुम्हाला देतो सांगितलं. त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यातून त्यांची एकनिष्ठता दिसून येते. मुख्यमंत्रीपद नको, पण काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीला (NCP) सोडा. ते आपल्याला संपवण्यास निघाले आहेत. भाजप (BJP) सोबत युती करा आणि त्याचे मुख्यमंत्री व्हा असं सांगितलं. मग त्यांची बदनामी का केली जात आहे? तुम्हाला आघाडी तोडावी का वाटली नाही याचं उत्तर द्या, अशी विचारणा केसरकर यांनी केली आहे.

 

परब यांचा फोन तपसा सगळं उघड होईल
मी मीडियामध्ये बातमी वाचली की उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) फोन केला होता.
तिथं त्यांनी शिंदेंना बाजूला ठेवा मी स्वत: तुमच्याबरोबर येतो आणि आपण युती करुया असं म्हटलं गेलं होतं.
म्हणजे तुमच्या पक्षामध्ये जे नंबर दोनचे नेते आहेत आणि जे तुमचा आदर करतात तुम्ही त्यांच्याच बाबत जर असं करत असाल तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकाचं काय होईल? आता याबातमीवर शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं की हे खोटं आहे.
जर हे खोटं असेल तर तुम्ही अनिल परबांचा (Anil Parab) फोन तपासून पहा.
त्यातून जर फडणवीसांना फोन गेला असेल तर निश्चितपणे हे घडलं असेल असं मला वाटतं.
कारण कधी उद्धव ठाकरेंचे फोन हे त्यांच्या फोनवरुन जात नाहीत. अनिल परबांच्या फोनवरुन जातात.
त्यामुळे त्यांचा फोन तपासा मग स्पष्टीकरण द्या, असे केसरकर म्हणाले.

आमच्यात शिवसेनेचे रक्त
आम्ही आमदारकी वाचवू शकलो असतो, आम्ही आमचा वेगळा गट स्थापन करुन दुसऱ्या पक्षात विलीन करु शकलो असतो,
पण ते आमच्या रक्तात नाही म्हणूनच याला शिवसेनेचं रक्त म्हणतात. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत,
म्हणून आमदारकी पणाला लावली. तुमच्यात ही हिंमत असेल तर स्वत:ला शिवसैनिक म्हणा, असं आव्हान त्यांनी दिले.

 

Web Title :- Deepak Kesarkar | shivsena deepak kesarkar aditya thackeray eknath shinde maharashtra politics election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Ayurveda Tips | लठ्ठपणा कंट्रोल करण्यासाठी आयुर्वेदाचा आधार, जाणून घ्या कोणत्या गोष्टी खाल्याने कमी होते वजन

 

Pune Crime | सराफी दुकानातून 2 कोटी 60 लाखांचे 5 किलो सोन्याची बिस्किटे चोरुन नेणारी महिला गजाआड

 

CBSE 12th Result | सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल