पोलिसांच्या ताब्यातील आरोपीची आत्महत्या

यवतमाळः पोलीसनामा ऑनलाईन

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना यवतमाळमधील अमराईपुऱ्यात आज (गुरूवार) सकाळी घडली आहे. बबन लक्ष्मण पवार (वय-50) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. चोरीच्या संशयावरुन सदर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होते.

याप्रकरणी पोलीस पथकाचे प्रमुख फाैजदार संतोष मनवर यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. चारचाकी  गाडी चोरल्याच्या संशयावरुन बबनला पोलिसांनी चाैकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र या चोरीशी माझा काही संबध नसून माझी विनाकारण बदनामी केली जात असल्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे बबन ने सुसाईट नोटमध्ये लिहले आहे. बबनची सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे.

[amazon_link asins=’B0794W14FY,B07D77V1DX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7b1f28ac-a15d-11e8-ae09-5523c6ebd67d’]