दाम्पत्यांचा आत्महत्येचा प्रयत्न, पतीचा मृत्यू तर पत्नी बचावली

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – कर्जाला कंटाळून एस टी महामंडळातील वाहकाने पत्नीसह विहिरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात त्याचा मृत्यू झाला असून पत्नीला वाचविण्यात यश आले आहे. रत्नागिरीजवळील कुवारबाव येथे सोमवारी सकाळी हा प्रकार घडला.

अशोक चव्हाण असे या एस टी महामंडळातील सेवानिवृत्त वाहकाचे नाव आहे. त्यांनी दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्ती घेतली होती. त्याबाबत त्यांचे प्रकरण कामगार न्यायालयात सुरु होते. कुवारबाव येथे त्यांचे छोटेसे दुकान आहे. या दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी असून दोघेही विवाहित आहेत.

कर्जाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांनी माने इंटरनॅशनल स्कुल जवळच्या विहिरीत उडी मारली. विहिरीला पाणी कमी होते. त्यात चव्हाण यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीला वाचविण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त