हडपसरमध्ये विवाहीतेची ११ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

पतीच्या छळाला कंटाळून एका विवाहीत महिलेने इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पतीविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.७) कॉसमॉस अपर्टमेंट ११ वा मजला एफ विंग मगरपट्टा सिटी हडपसर येथे घडली.

मिनाक्षी गिरीश पांडे (वय-४६ रा. कॉसमॉस अपर्टमेंट, ११ वा मजला, एफ विंग, मगरपट्टा सिटी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नाव आहे. याप्रकरणी तीचा पती गिरीश सुरजप्रसाद पांडे (वय-४७) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिनाक्षची बहिण मृत्युंजय पाठक (वय-५६ रा. मंडल, मध्यप्रदेश) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनाक्षी आणि गिरीश यांचे मे २०१८ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर सासरी नांदत असताना पती गिरीश याने मिनाक्षी यांचा छळ करण्यास सुरुवात केली. तीला टोचून बोलून शारिरीक आणि मानसिक छळ केला. पतीच्या छळाला वैतागून मिनाक्षी यांनी शनिवारी इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.