वाघोली येथील नवले हॉस्पिटलमध्ये नर्सची गळफास घेऊन आत्महत्या

वाघोली –  पोलीसनामा ऑनलाइन  – पुण्याजवळील वाघोली येथील नवले हॉस्पिटलमध्ये काल रात्री एका २१ वर्षीय नर्सने गळफास घेऊन आत्महत्या केली.सदर हॉस्पिटलच्या नर्स रेस्ट रुम मध्ये नर्सने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

प्रियंका कांबळे असे आत्महत्या केलेल्या नर्सचे नाव असून प्रियंका मूळची लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील कल्लाळ गावची रहीवाशी आहे. प्रियंका मागील काही दिवसांपासून वाघोली येथील नवले हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. स्थानिक पोलीसांनी पंचनामा केला आहे.

प्रियंकाचा मृत्यु हा परिसरात चर्चेचा विषय आहे. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे दिला असुन पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.