अंतिम इच्छा व्यक्त करत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा आॅनलाईन

पिंपरी-चिंचवडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून अंतिम इच्छा ही सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली आहे.ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास चिंचवड येथे घडली आहे. भावाच्या मुलाला खूप शिकवा,आई बाबा तुमचे लव्ह मॅरेज झाले आहे तुम्ही व्यवस्थित राहा,तर माझ्यावर अंतिम संस्कार हे विश्ववेश्वर येथे करा,अश्या प्रकारची सुसाईड नोट लिहून ३४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

जतीन धनंजय जहागीरदार वय-३४ रा.राम मंदिर शेजारी चिंचवड गाव.अस आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जतीन हा अविवाहित आहे,तो गेल्या काही दिवसांपासून शेजारी असणाऱ्या इमारतीच्या टेरिसवर झोपायला येत होता.रात्री देखील इमारतीच्या टेरिसवर झोपायला आला,सकाळी मित्रांनी उठवले आणि खाली जाऊ असे म्हटले मात्र जतीन याने मित्रांना पुढे जाण्यास सांगितले.मित्र खाली गेल्यानंतर काही मिनिटातच जतीन ने गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपविली.आत्महत्येपूर्वी जतीन ने सुसाईड न लिहून ठेवली होती यात त्याने त्याची अंतिम इच्छा व्यक्त केली आहे.तसेच भावाच्या मूलाला शिकवण्याचे चिठ्ठीत म्हटले आहे.अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.