मैत्रिणीसोबत फिरायला आलेल्या महिलेची वीष प्राशन करून आत्महत्या 

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – मैत्रिणीसोबत कण्हेर धरण परिसरात फिरायला आलेल्या महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

शुभांगी सुदाम सुतार (वय २६, रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

शुभांगी हिचा घटस्फोट झालेला आहे. ती तिच्या मैत्रिणीसोबत मंगळवारी सायंकाळी कण्हेर धरणाजवळ फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने विषारी औषध प्राशन केले. मैत्रिणीला हा प्रकार समजल्यानतंर तिने तात्काळ शुभांगीला जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तिचा उपचारापुर्वी मृत्यू झाला. तर तिने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.