Sujit Patwardhan Passed Away | परिसर संस्थेचे सुजित पटवर्धन यांचे निधन

पुणे : Sujit Patwardhan Passed Away | पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि परिसर संस्थेचे संस्थापक सुजित पटवर्धन यांचे शनिवारी पहाटे निधन (Sujit Patwardhan Passed Away) झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

सुजित पटवर्धन गेले काही दिवस आजारी असल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले.

सुजित पटवर्धन हे व्यवसायाने प्रिंटर होते. इंग्लंडमध्ये प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा अभ्यास करुन ते पुण्यात परतले. नारायण पेठेत त्यांनी मुद्रा ही प्रिंटिंग प्रेस स्थापन करुन त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला होता.

पुणे शहर व पिंपरी चिंचवड मधील सार्वजनिक वाहतूक सक्षम व्हावी, यासाठी ते गेली २ दशक प्रयत्नशील होते.
सायकल ट्रॅक, बीआरटी, पदपथ, नदी सुधार या विषयावर त्यांनी काम केले.
शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यासाठी त्यांनी १९८० मध्ये परिसर संस्थेची स्थापना केली.
खासगी वाहनांच्या संख्येवर नियंत्रण राखण्यासाठी आणि शहरातील हवा प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांनी
महापालिकेकडे पार्किंग धोरण आखण्याची सातत्याने मागणी करुन पाठपुरावा केला होता.

Web Title :-  Sujit Patwardhan Passed Away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | दिवाळीच्या स्टॉलसाठी फिडरमधुन वीज घेण्याचा प्रयत्न करताना तरुणाचा मृत्यू

Maharashtra IPS Officer Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील 5 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Pune ACB Trap | डेप्युटी साहेबांकरिता पॅकेज व स्वतःकरिता मोबाईलची लाच मागणारा पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात