Pune ACB Trap | डेप्युटी साहेबांकरिता पॅकेज व स्वतःकरिता मोबाईलची लाच मागणारा पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रार अर्जावरुन गुन्हा (FIR) दाखल करण्यासाठी डेप्युटी साहेबांसाठी (Senior Officer) पॅकेज आणि स्वत: साठी मोबाईलची (Mobile) लाच मागणाऱ्या (Demanding Bribe) पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलातील पोलीस हवालदार विरुद्ध पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यातील (Shikrapur Police Station) पोलीस हवालदार अमिरुद्दीन रफीउद्दीन चमन शेख (Police Constable Amiruddin Rafiuddin Chaman Shaikh) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुणे एसीबीने (Pune ACB Trap) शुक्रवारी (दि.21) गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत 43 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी अमिरुद्दीन शेख यांनी डेप्युटी साहेबांकरिता पॅकेज आणि स्वत:साठी मोबाईलची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

 

पुणे एसीबीच्या युनिटने 28 जुलै रोजी पडताळणी केली असता, पोलीस हवालदार अमिरुद्दीन शेख याने तक्रार अर्जावरुन गुन्हा दाखल
करण्यासाठी डेप्युटी साहेबांकरिता पॅकेज आणि स्वत: साठी मोबाईलची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
शुक्रवारी अमिरुद्दीन शेख यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत साळुंखे (Police Inspector Bharat Salunkhe),
पोलीस शिपाई भूषण ठाकूर, चालक पोलीस नाईक कदम यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune ACB Trap | A policeman who demanded a bribe for a package for the deputy and a mobile phone for himself is in the net of anti-corruption

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ST Fare Hike | एसटीची दिवाळी हंगामी भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून लागू, प्रवाशांच्या खिशावर 5 ते 75 रुपयांचा भार

Pune CP Amitabh Gupta On Traffic | पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचे मोठे पाऊल

Ajit Pawar | दर्जेदार विकासकामे उंटावरुन शेळ्या हाकून होत नाहीत, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना माहेरचा आहेर