Sukesh Chandrasekhar | 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या आयुष्यावर येणार सिनेमा? कोण साकारणार भूमिका

पोलीसनामा ऑनलाइन : गेल्या अनेक दिवसांपासून 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे (Money Laundering Case) सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) हा चर्चेत आहे. सुकेशने आजवर अनेक लोकांची फसवणूक (Cheating Case) केली आहे. सुकेश हा मूळचा बंगलोरमध्ये राहणारा आहे. सुकेश हा एक उद्योजक आहे. नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्याने गरजू लोकांची फसवणूक केली आहे. एवढेच नाही तर निवडणूक आयोगात माझी चांगली ओळख आहे असे सांगून तुम्हाला हवे ते चिन्ह मिळवून देण्याचे आमिष देखील त्यांनी दाखवले. या प्रकरणी त्याला दिल्ली पोलिसांनी 2017 साली अटक केली. आता याच सुकेशवर (Sukesh Chandrasekhar) सिनेमा येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सिनेमाची निर्मिती आनंदकुमार करणार आहेत. सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरू आहे.

याच सुकेशने 200 कोटी मनी लॉंड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिले असल्याचे समोर आले. यामध्ये जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेहीचे (Nora Fatehi) नाव देखील समोर आले आहे. सुकेश सध्या दिल्लीतील मंडोळी कारागृहात आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यावरील सिनेमाचे कथानक लिहिण्यासाठी आनंदकुमार थेट मंडोळी कारागृहात पोहोचले असल्याचे समोर आले आहे.

आता सिनेप्रेमींना सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrasekhar) या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे सुकेश हा बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन आणि नोरा सोबत रिलेशनशिप मध्ये होता. त्यामुळे या सिनेमात या दोघींची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या सिनेमात 200 कोटीच्या मनी लॉंड्रिंग प्रकरण पर्यंतचा त्याचा प्रवासही दाखवण्यात येणार आहे.

सुकेशने आजवर जॅकलीनला 5 जनावरे भेट म्हणून दिले आहेत. त्यामध्ये अरबी घोडा ज्याची किंमत तब्बल
52 लाख 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही
यामध्ये समावेश आहे. सुकेशच्या अटकेनंतर अभिनेत्री जॅकलीन आणि नोरा यांची ईडी कडून सध्या चौकशी सुरू आहे.

Web Title :- Sukesh Chandrasekhar | sukesh chandrasekhar movie jacqueline fernandez nora fatehi lead role know about who is sukesh chandrasekhar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Farhad Samji | दिग्दर्शक फरहाद सामजीने सतीश कौशिक यांच्यावर लिहिलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले “सतीश कौशिक ही अशी पहिली व्यक्ती…..”

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

MP Supriya Sule | खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा