अभिनेता ह्रतिक रोशनची बहिण ‘या’ मुस्लीम पत्रकाराला करतेय ‘डेट’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – हृतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यातील शीतयुद्ध आपल्या सगळ्यांना माहित आहेच. त्यांच्यातील प्रेमप्रकरणानंतर त्यांच्यातील ई-मेल युद्ध देखील सगळ्यांनी पहिले असेल. मात्र आता त्याची बहीण एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री कंगना राणावतची बहिण रंगोलीने काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता. त्यानंतर आता तिच्यावर केल्या जाणाऱ्या अन्यायानंतर आता तिच्या बॉयफ्रेंडमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याविषयी बोलताना कंगनाची बहीण रंगोली हिने म्हटले होते कि, मुस्लीम तरुणावर प्रेम करत असल्याने सुनैनाला रोशन कुटुंबिय मारहाण करत असल्याचे रंगोलीने म्हटले होते.

यानंतर आता तो मुस्लीम मुलगा कोण हे पुढे आले आहे.या विषयी रंगोली हिने ट्विट करत म्हटले होते कि, ‘सुनैनाचे मुस्लीम व्यक्तिवर प्रेम आहे. त्यामुळे तिचे कुटुंबीय तिचा छळ करत असून तिच्यावर नाते तोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे. माध्यमांमध्ये आलेल्या महीतीनुसार रूहैल अमीन असे त्याचे नाव असून तो दिल्लीच्या एका न्यूज ऑर्गनायझेशन साठी काम करत असून तो विवाहीत आहे. त्यानंतर सुनैना हिने देखील हा आरोप खरा असल्याचे देखील एका माध्यमाशी बोलताना म्हटले होते. माझे या व्यक्तीवर प्रेम असल्याचे समजल्यावर माझ्या वडिलांनी माझ्यावर हात उचलला. त्याचबरोबर तो दहशतवादी असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते, असा आरोपदेखील तिने आपल्या कुटुंबियांवर केला होता.

दरम्यान, माझे त्याच्यावर प्रेम असून मला त्याच्यासोबत आयष्य घालवायचे असून माझे कुटुंब मात्र यासाठी तयार नसल्याचे तिने म्हटले आहे. त्यानंतर याविषयी रूहैलला विचारण्यात आले असता त्याने या विषयावर बोलण्यास नकार दिला.

आरोग्यविषयक वृत्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय