‘खिलाडी’ अक्षयच्या ‘सूर्यवंशी’चा ट्रेलर पाहून सुनील शेट्टीनं दिले ‘इतके’ स्टार, त्यावर अक्षय म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन – रोहित शेट्टीनं डायेरक्ट केलेला बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ स्टारर सूर्यवंशी या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. रिलीज होताच हा ट्रेलर युट्युबवर ट्रेंड करतानाही दिसला. खास बात अशी या सिनेमात सिंघम अजय देवगण आणि सिंबा रणवीर सिंग हेदेखील एन्ट्री मारणार आहेत. ट्रेलरनंतर आता सिनेमाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अशात आता अभिनेता सुनीश शेट्टीनं ट्रेलरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेलर पाहिल्यानंतर अभिनेता सुनील शेट्टी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच त्यानं ट्रेलरला रेटींगही दिलं आहे. आपल्या ट्विटमध्ये सुनील शेट्टी म्हणतो, “माझ्याकडून सुपर कॉप्स आणि सूर्यवंशीच्या सुपर टीमला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा.” सोबतच सुनील शेट्टीनं ट्रेलरला 5 स्टार दिले आहेत. यावर अक्षय कुमारनंही त्याला रिप्लाय दिला आहे. अक्षय म्हणतो, “थँक यु ब्रदर.”

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये आतापर्यंत सिंघम, सिंघम रिटर्न्स, आणि सिंबा अशा सिनेमांचा समावेश आहे. यातील आता चौथा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ स्टारर सूर्यवंशी सिनेमात जबरदस्त अॅक्शन पहायला मिळणार आहे. 24 मार्च 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.