आई- बहिणीचा उद्धार का ? ट्रोलर्सवर संतापला सुनील ग्रोवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुनील ग्रोवर सध्या गॅग्स ऑफ फिल्मिस्तान नव्या शोमुळे चर्चेच आला आहे. तो बर्‍याच वेळा समाजात घडणार्‍या गोष्टीवर निर्भीडपणे मत व्यक्त करत असतो. त्यामुळे अनेकदा त्याला सोशल मीडियावर ट्रोलदेखील व्हावे लागते. ‘अशा ट्रोलर्सकडे मी दुर्लक्ष करतो. मात्र, या ट्रोलिंगमध्ये आई-बहिणींच्या नावाचा उद्धार का होतो?’ असा प्रश्न त्याने विचारत संताप व्यक्त केला आहे.

मी काही वाईट काम केलेले नाही मग हे लोक ट्रोल का करतात हा प्रश्न मला कायम पडतो. चारजण कौतुक करणारे असतील तर 1-2 जण टीका का करतात हे मला कधीच कळत नाही. मात्र मी याकडे दुर्लक्ष करतो. कारण हे सोशल मीडिया आहे आणि इथे असे ट्रोलिंग होतच राहणार. यात मला फक्त लोकांच्या कमेंट्स पाहायला मिळतात. त्या लोकांना मी वैयक्तिकरित्या ओळखत देखील नसतो. त्यामुळे मी या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सुनील म्हणाला. माझे ट्रोलिंग केल्यामुळे मला कोणताच फरक पडत नाही. तुम्ही माझ्याविषयी कोणते मत मांडता याबद्दल मला काहीच वाटत नाही. कारण प्रत्येक जण त्यावर त्यांची मत नोंदवत असतो. कितीही काही सांगायचा प्रयत्न केला तरी लोक तुम्हाला खोटंच ठरवणार आहेत. मात्र हे खरंच फार नकारात्मक आहे. अनेक जण फेक अकाऊंटवरुन ट्रोलिंग करतात. मला फक्त इतकंच सांगायचे आहे, जर तुम्हाला माझे काम आवडले नाही तुम्ही थेट सांगा. पण प्रत्येक वेळी ही गोष्ट सांगताना आई आणि बहिणीच्या नावाचा उद्धार का होतो? त्यांच्यावरुन शिवी का दिली जाते? असा सवाल त्याने विचारला आहे .