Sunil Tatkare In Pune | लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा वाटपाबाबत निर्णय होईल; पुणे लोकसभा आणि महापौर पदाच्या प्रश्‍नाला सुनिल तटकरेंनी बगल दिली

पुणे – Sunil Tatkare In Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशाचा वेगाने विकास होत आहे. त्यामुळे आम्ही महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुका देखिल महायुती म्हणूनच एकत्रित लढविण्यात येतील. पहिल्यांदा लोकसभा (Lok Sabha Elections 2024) आणि विधानसभा निवडणुका (Maharashtra Vidhan Sabha Elections) होणार असून त्यानंतर स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तूर्तास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींवर लक्ष केंद्रीत करत आहोत, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर एकत्रित बसून निर्णय घेण्यात येईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशअध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare In Pune) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.

याप्रसंगी पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशअध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), शहरअध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar), कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh), प्रदेश सदस्य दत्तात्रय धनकवडे उपस्थित होते. विकासासाठी सरकारमध्ये सहभागी झाल्याचा पुनरूच्चार करत तटकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील समन्वयासाठी तीन्ही पक्षांच्या नेत्यांचा समावेश असलेली समन्वय समिती स्थापन केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघटन बांधणी सुरू केली आहे. पुण्याच्या कार्यकारिणीच्या नियुक्तीपासून सुरूवात करण्यात आली असून लवकरच प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली विभागवार नियुक्त्या आणि बैठकांचे आयोजन करण्याचे वेळापत्रक तयार केले आहे. (Sunil Tatkare In Pune)

राष्ट्रवादी कॉंग्रेसने यापुर्वी देखिल पुणे लोकसभेची जागा मागितली आहे. तसेच महापौरपदही राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळेल असा दावा केला आहे. याबाबत बोलताना तटकरे म्हणाले की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका अगोदर होणार असून त्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. तीन्ही पक्षांच्या बैठकीमध्ये जागा वाटपाबद्दल निर्णय घेतला जाईल. त्यानंतर महापालिकांसह स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने त्यावेळी देखिल घटक पक्षांच्या बैठकीत निर्णय होईल, त्यानुसार जागा व पदांचे वाटप होईल, असे उत्तर देत तटकरे यांनी पुणे लोकसभा आणि महापौर पदाच्या प्रश्‍नाला बगल दिली.

शरद पवारांचा फोटो वापरण्याबाबत वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेउ

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत त्यांच्या फोटोचा वापर करू नये अथवा न्यायालयात जाउ असा इशारा दिला आहे. यावर स्पष्टीकरण देताना सुनिल तटकरे म्हणाले, की पवार साहेब आमचे दैवत आहे. परंतू त्यांनी फोटो वापरण्याबाबत केलेल्या विधानावर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिले.

महापालिकेच्या निवडणुका २०२४ मध्ये दिवाळीनंतर!

सुनिल तटकरेंच्या स्पष्टीकरणामुळे स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वर्षभर लांबण्याचे संकेत

महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढविण्याबाबत स्पष्टीकरण देताना
सुनिल तटकरे यांनी अगोदर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होईल.
त्यानंतर स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असे स्पष्टीकरण दिले.
केंद्र आणि राज्यातील सत्तेतील मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशअध्यक्ष तटकरे
यांच्या या स्पष्टीकरणामुळे प्रशासकराज असलेल्या बहुतांश महापालिका,
नगरपालिकांच्या निवडणुका पुढीलवर्षी अर्थात २०२४ मध्ये दिवाळीच्या आसपास होण्याची शक्यता वाढली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | ‘…तेव्हा राग का आला नाही’, शरद पवारांचा उल्लेख करत भाजप मंत्र्याचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल