Sunil Tatkare In Pune | राज्यात 2016 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना की फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येणार होती याचा खुलासा योग्यवेळी करू – सुनिल तटकरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sunil Tatkare In Pune | राज्यामध्ये २०१६ मध्येही भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस असे एकत्र येणार होतो की केवळ भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस असे गणित जुळविले होते, याबाबत आपण योग्यवेळी सांगू असे स्पष्ट करत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशअध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सस्पेन्स वाढविला आहे. त्याचवेळी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मित्र पक्षांसोबतची बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाची यंत्रणा उभारण्यासाठी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज बैठक झाली. डेक्कन जिमखाना येथील हॉटेल सेंट्रल पार्क येथे झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहीत पवार यांच्यासह पवार गटातील अन्य नेत्यांना धारेवर धरले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष दीपक मानकर आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख उपसिथत होते. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी पक्ष आणि चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयानंतर काहीजण नैराश्यातून आरोप करत आहेत. परंतू आम्ही आत्मविश्‍वासाने संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळत असून पक्षात प्रवेश करणार्‍यांची संख्या वाढली आहे. पक्षाच्या मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भाजपसोबत जाण्याचा निर्णय आताचा नाही. यापुर्वी २०१४ मध्ये भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वंतत्र निवडणूक लढलो. विधानसभा निवडणुकीचे कल येत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला पाठींबा जाहीर केला. मात्र, नंतर माघार घेतली. २०१६ मध्येही भाजपला पाठींबा द्यायचा निर्णय झाला. परंतू तो देखिल पुढे गेला नाही. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भाजपला पाठींबा देत सत्ता स्थापन केली. परंतू तेथूनही माघार घ्यायला लावली. आता त्याच अदृश्य शक्ती आमच्यावर नैराश्यातून करत आहेत, असा टोला तटकरे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा नामोल्लेख टाळत केला. मात्र, २०१६ मध्ये भाजप- शिवसेना युतीचे सरकार असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांसोबत महायुतीत सहभागी होणार होती की केवळ भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार होती? या प्रश्‍नाला बगल देत योग्यवेळी त्याचेही स्पष्टीकरण देउ असे म्हणत सस्पेन्स वाढविला.

महायुतीच्या लोकसभेच्या जागावाटपांबाबत अद्याप चर्चा झाली नाही. लवकरच मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल. नंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जागा वाटप जाहीर करण्यात येईल, असे सांगतानाच बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंगे्रेसकडेच राहील हे तटकरे यांनी ठामपणे सांगितले. तसेच सुनेत्रा अजित पवार यांनाच येथून उमेदवारी देण्याची मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांची मागणी असल्याने त्याच उमेदवार असतील, असेही तटकरे यांनी नमूद केले.

पुर्वी कॉंग्रेसमध्ये असलेले सध्याचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकित पाटील- ठाकरे यांनी इंदापूर
विधानसभा मतदारसंघातून आम्ही निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करतानाच राष्ट्रवादी कॉंगे्रेसने तीन वेळा
पाठीत वार केल्याचे नुकतेच सुनावले. यावर बोलताना तटकरे म्हणाले, २०१४ मध्ये कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकी अगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतची आघाडी तोडली. इंदापूरमधून आमचे दत्तात्रय भरणे विजयी ठरले. २०१९ मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी पक्षांतर केल्याने उमेदवारीचा काही प्रश्‍नच नव्हता.
बंधू अनिल तटकरे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल विचारले असता सुनिल तटकरे म्हणाले,
की २०१४ पासूनच अनिल तटकरे यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांचा प्रवेश म्हणजे बुद्धीभेद करण्याचा
प्रयत्न असल्याची टीका तटकरे यांनी केली. राजकारण आणि कुटुंब या दोन वेगळ्याबाबी आहेत.
राजकारणात पुर्वीपासून एकाच कुटुंबातील व्यक्तींनी वेगवेगळ्या विचारधारांवर काम केले असून त्यामध्ये नवीन असे काही नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | ‘सगेसोयरे’साठी मराठा समाज आक्रमक! जरांगे म्हणाले ”आता २४ फेब्रुवारीपासून राज्यभर रास्तारोको, ३ मार्चला…”

Pune Hadapsar Crime | पुणे : कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण, चार जणांवर विनयभंगाचा गुन्हा

Shivsena Shinde Group | महायुतीत जागावाटपावरून मीठाचा पहिला खडा पडला, शिंदे गटाचा नेता म्हणाला, ”शिवसेना भाजपाच्या दावणीला…”

Pune Yerawada Crime | मुलींमध्ये नाचल्याच्या कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, येरवडा परिसरातील घटना