या’ कारणामुळं सनी देओलनं ‘किंग’ खानसोबत काम करणं बंद केलं !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता सनी देओलने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सनेमे दिले आहेत. त्याचे अनेक डायलॉग्स आजही चाहत्यांच्या ओठावर आहेत. आज सनी देओल आपला 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. 1993 साली आलेला डर सिनेमा आजही चाहते विसरलेले नाहीत. परंतु या सिनेमानंतर मात्र त्याने शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिला. याचे कारण सनीनं एका मुलाखतीत सांगितले आहे. त्याला या सिनेमा प्रमुख अभिनेत्याची भूमिका सांगण्यात आली होती परंतु शूट सुरू झाल्यानंतर समोर आलं की, तो हिरो नाही.

View this post on Instagram

#love

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol) on

सनी देओल म्हणाला, “यश चोप्रा आणि शाहरुख खान दोघांनाही माहिती होतं की सिनेमा कुठे चालला आहे. सर्वांनी मला अंधारात ठेवलं. जेव्हा मला शाहरुख आणि माझ्या भूमिकेविषयी सीन सांगण्यात आले तेव्हा मला खूप राग आला होता. मी माझे हात जीन्सच्या खिशात टाकले. रागात जीन्सचे खिसे कधी फाटले हेदेखील मला समजले नाही.”

सनीला माहिती नव्हतं की सर्व फोकस शाहरुखवर आहे. त्याचं असं म्हणणं होतं की, त्याला हे सर्व आधी सांगायला हवं होतं. यानंतर सनीने निर्णय घेतला की, शाहरुखसोबत काम करणार नाही. यानंतर त्याने अनेक सिनेमात एकट्यानेच काम केलं. भाऊ बॉबी देओलसोबत मात्र त्याने अनेक सिनेमे दिले. सनी देओल डर सिनेमानंतर शाहरुख खानशी 16 वर्षे बोलला नव्हता. सनीबद्दल आणखी सांगायचे झाले तर सनी देओल गुरदासपुरमधून भाजपचा खासदार आहे.

View this post on Instagram

My hideout. #relaxing #peace

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol) on

View this post on Instagram

पल पल दिल के पास

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol) on

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like