…म्हणून ‘डर’ सिनेमानंतर शाहरुख खानसोबत 16 वर्ष बोलत नव्हता ‘खासदार’ सनी देओल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, सनी देओल आणि अभिनेत्री जुही चावला स्टारर डर हा सिनेमा सर्वांनाच माहीत आहे. तुम्हाला एक सिक्रेट माहीत आहे का? डर सिनेमानंतर सनी देओल शाहरुख खानसोबत तब्बल 16 वर्ष बोलला नव्हता. एवढेच काय तर सनीने यानंतर यशराज फिल्ममध्ये देखील काम केले नाही. एका चॅटशोमध्ये सनी याबाबत बोलला आहे. याआधीही त्याने याबाबत भाष्य केले आहे.

सनी देओलला जेव्हा विचारण्यात आले की, डर सिनेमा दरम्यान सर्वांच्या मनात तुझ्याबद्दल भीती होती. त्यावर सनी देओल म्हणाला की, “नक्कीच आतमध्ये काही खोट राहिली असेल ज्यामुळे भीती असेल.” यानंतर त्याला विचारण्यात आले की, तू या सिनेमानंतर 16 वर्ष शाहरुखसोबत बोलला नाहीस. ही गोष्टी स्वीकार करत सनीने यावरही भाष्य केले.

या भांडणामागचं कारण सांगत सनी देओल म्हणाला की, “शेवटी या सिनेमात मला आणि शाहरुखला लोकांनी पसंत केलं. या सिनेमाबद्दल मला फक्त हाच प्रॉब्लेम होता की, मला वाटलं नव्हतं की, या सिनेमात विलेनला एवढं गौरविण्यात येईल. मी नेहमीच मोकळ्या मनाने आणि लोकांवर विश्वास ठेवून सिनेमात काम करतो. दुदैवाने असे अनेक अॅक्टर्स आहेत जे असं काम करत नाहीत. बहुतेक त्यांनाही असंच स्टारडम हवं असतं.”

सनी देओलने फिल्मफेअर सोबतच एका मुलाखतीत म्हटलं होतं की, तो यश चोपडा सोबत काम करणार नाही. ते भरोशाचा माणूस नाहीत. सनीने म्हटले होते की, यश चोपडा यांनी त्याच्यासोबत दगा केला होता.

आरोग्य विषयक वृत्त –

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

योगासनांमध्ये ‘सातत्य’ असणे फायद्याचे

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like